Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 12:37 PM2019-05-03T12:37:57+5:302019-05-03T12:49:21+5:30
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवार पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (3 मे) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शोपियानमध्ये शुक्रवारी चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. शोपियानमधील चकमकीनंतर परिसरातील मोबाइल इंटरनेट सेवा ही काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.
Jammu & Kashmir: One terrorist killed in Shopian encounter, search operation underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/F0apAXgv42
— ANI (@ANI) May 3, 2019
जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये मंगळवारी (9 एप्रिल) दहशतवाद्यांनी रुग्णालयात घुसून फार्मासिस्ट आणि RSS नेत्याची हत्या केली होती. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गंभीर जखमी असलेल्या आरएसएस नेत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आरएसएस नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पीएसओ जवान या गोळीबारात शहीद झाला आहे. मंगळवारी दुपारी किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी घुसून फार्मासिस्ट व आरएसएस नेते चंद्रकांत शर्मा आणि त्यांचे पीएसओ यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पीएसओ जवान घटनास्थळीच शहीद झाला. RSS नेत्याला एअरलिफ्ट करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज(जीएमसी)मध्ये आणण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
Jammu And Kashmir : त्रालमध्ये जवानांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले
जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये रविवारी (7 एप्रिल) पहाटेपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू होती. या परिसरात जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सुरक्षा दलांच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळली होती. त्राल भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानूसार 42 राष्ट्रीय रायफलचे जवान, सीआरपीएफच्या 180 बटालीयनचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने या परिसराला घेराव घातला आहे. जवानांकडून शोध मोहीम राबविण्यात आली असता दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यावेळी जवानांनी देखील त्यांना उत्तर देत गोळीबार सुरू केला होता.
शनिवारी (6 एप्रिल) शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या परिसराला घेराव घातला. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबारास सुरुवात झाली. अखेरीस लष्कराने लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. याआधी पुलवामा जिल्ह्यात याच आठवड्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले होते. त्या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्याआधी गेल्या आठवड्याच शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते.
दहशतवाद्यांनी केली सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, कुटुंबीयांसमोरच झाडल्या गोळ्या
काश्मीरमधील सोपोर भागात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद रफी यातू असं या जवानाचे नाव असून त्याच्या कुटुंबीयांसमोर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. रफी हा सुट्टीसाठी त्याच्या सोपोरमधील वारपोरा गावी आला होता.