काश्मिरात अतिरेकी हताश होत आहेत, पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:24 AM2017-10-22T00:24:36+5:302017-10-22T00:28:52+5:30

काश्मीरमधील परिस्थिती सुधारत आहे आणि तेथे सध्या दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे हताश झाल्याचे चित्र दिसत आहे, असे ठाम प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी येथे केले.

Extremists are desperate in Kashmir, again need to 'surgical strike' | काश्मिरात अतिरेकी हताश होत आहेत, पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याची गरज

काश्मिरात अतिरेकी हताश होत आहेत, पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याची गरज

googlenewsNext

जम्मू : काश्मीरमधील परिस्थिती सुधारत आहे आणि तेथे सध्या दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे हताश झाल्याचे चित्र दिसत आहे, असे ठाम प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी येथे केले.
लष्कराच्या ४७ व्या चिलखती रेजिमेंटला राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान केल्यानंतर जवानांसमोर बोलताना जनरल रावत म्हणाले की, लष्कराने ‘सदभावना शिबिरे’ आयोजित करणे सुरू केल्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. अनेक तरुण दहशतवाद्यांच्या विखारी प्रचाराला बळी न पडता लष्करात व पोलिसांत भरती होण्यासाठी पुढे येत आहेत.
मात्र दहशतवादविरोधी लढ्यात चढ-उतार होतच राहतात, असे नमूद करून ते म्हणाले की, दहशतवाद्यांतर्फे समाजमाध्यमांतून चालविल्या जाणाºया मोहिमांना काही चुकार युवक बळी पडतात पण त्यांचा आम्ही बंदोबस्त करतो. पण मार्ग चुकलेले अनेक तरुण शरणागती पत्करून सुरक्षा दले आणि पोलिसांच्या स्वत:हून स्वाधीन होत आहेत.
विखारी धार्मिक प्रचाराने माथी भडकावणे हा प्रकार केवळ भारतातच नव्हे तर जगभर सर्वत्र सुरू आहे व ती एक गंभीर चिंतेची बाब आहे, हे मान्य करून ते म्हणाले की, नागरी प्रशासन व सुरक्षा दले हा प्रश्न निकडीने हाताळत आहेत. काश्मीर खोºयात महिलांच्या वेण्या कापण्याचे अनेक प्रकार वारंवार घडत आहेत. लष्कर त्याकडे एक आव्हान म्हणून पाहते का, असे पत्रकारांनी विचारता जनरल रावत म्हणाले की, यास तुम्ही आव्हान का म्हणता कळत नाही. असे प्रकार देशाच्या इतर भागांतही घडले आहेत. त्यांचाही योग्य बंदोबस्त केला जाईल.
चीन सरहद्दीवर डोकलामचा
तिढा निर्माण झाला तशी
परिस्थिती येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उद््भवू शकते का, असे विचारता लष्करप्रमुख म्हणाले की, आपल्याला त्यासाठी सदैव जागरूक राहावे लागेल. (वृत्तसंस्था)
>‘सर्जिकल स्ट्राइक’ खेरीजही मार्ग आहेत
भारताने ‘सर्जिकल स्ट्राइक’
केल्या तरी सीमेच्या पलीकडे दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ सुरूच आहेत. त्याविषयी विचारता जनरल रावत म्हणाले की, सीमेपलीकडचे दहशतवाद्यांचे
तळ बंद झाल्याचे तुम्हाला कोणी सांगितले? ते तळ आधी होते आणि आताही सुरूच आहेत. त्याविरुद्ध ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा एक उपाय जरूर आहे व योग्य वेळी तो वापरायलाही हवा. पण त्याखेरीज इतरही मार्ग आहेत व त्यांचा अवलंब केला जात आहे.

Web Title: Extremists are desperate in Kashmir, again need to 'surgical strike'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.