पंतप्रधान मोदींच्या नमो अ‍ॅपशी संबंधित 15 पेजेस आणि अकाऊंट्सवर फेसबुकची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 07:25 PM2019-04-01T19:25:05+5:302019-04-01T19:29:18+5:30

सोशल मीडियावर फेक न्यूज आणि माहिती पसरवणाऱ्यांवर फेसबूककडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून, फेसबुकने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी निगडित असेल्या एका आयटी कंपनीशी संबंधित पेज आणि अकाऊंट्सवर कारवाई केली आहे.

Facebook has removed 15 pages and accounts linked to Silver Touch | पंतप्रधान मोदींच्या नमो अ‍ॅपशी संबंधित 15 पेजेस आणि अकाऊंट्सवर फेसबुकची कारवाई 

पंतप्रधान मोदींच्या नमो अ‍ॅपशी संबंधित 15 पेजेस आणि अकाऊंट्सवर फेसबुकची कारवाई 

Next

नवी दिल्ली - सोशल मीडियावर फेक न्यूज आणि माहिती पसरवणाऱ्यांवर फेसबूककडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून, फेसबुकने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी निगडित असेल्या एका आयटी कंपनीशी संबंधित पेज आणि अकाऊंट्सवर कारवाई केली आहे. नमो अॅपशी निडडित असलेल्या सिल्व्हर टच या आयटी कंपनीशी संबंधित असलेली 15 पेज आणि अकाऊंट्स फेसबुकवरून हटवण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या समर्थकांचा सोशल मीडियावरील वावर वाढला असून, त्यांच्याकडून खोट्या अकाऊंट्स आणि पेजेसचा वापक करून एकमेकांविरोधात फेक न्यूज आणि चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर फेसबूककडून ही कारवाई केली जात आहे. या कारवाईदरम्यान,  नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी निगडित असेल्या एका आयटी कंपनीशी संबंधित पेज आणि अकाऊंट्सवर ही कारवाई करताना ही अकाऊंट्स फेसबूकवरून हटवण्यात आली आहे.



 
 त्यापूर्वी फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित काही पेजेस आणि अकाऊंट्सवरही कारवाई केली होती. आक्षेपार्ह भाषेचा वापर असलेल्या तसेच निलंबित करण्यात आलेली काँग्रेसशी संबंधित सुमारे 687 फेसबूक पेजेस आणि अकाऊंट्स फेसबूकने हटवली होती.  
या पेजचे अॅडमिन आणि अकाऊंटसचे ओनर स्थानिक बातम्या, आगामी निवडणुकीसंदर्भातील राजकीय मुद्दे, उमेदवारांची भूमिका मांडत असत. तसेच भाजपासह काँग्रेसच्या इतर विरोधकांवर या पेजेस आणि अकाऊंट्सवरून टीका करण्यात येत असे. तसेच ही पेजेस आणि अकाऊंट्स काँग्रेसच्या आयटी सेलशी वैयक्तिकरीत्या जोडली गेली होती.  

Web Title: Facebook has removed 15 pages and accounts linked to Silver Touch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.