कुरापती पाकिस्तानच्या गोळीबाराला लष्काराचं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 08:12 AM2017-08-16T08:12:10+5:302017-08-16T08:50:17+5:30

पाकिस्तानच्या  कुरापतींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. बुधवारी (16 ऑगस्ट) सकाळीदेखील जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टर परिसरात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले.

The fierce reply to the firing of the Karachi Pakistan fighter | कुरापती पाकिस्तानच्या गोळीबाराला लष्काराचं चोख प्रत्युत्तर

कुरापती पाकिस्तानच्या गोळीबाराला लष्काराचं चोख प्रत्युत्तर

googlenewsNext

श्रीनगर, दि. 16 -  पाकिस्तानच्या  कुरापतींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. बुधवारी सकाळीदेखील जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टर परिसरात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. भारतीय जवानांनीदेखील पाकिस्तानच्या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर दिले. बुधवारी पहाटे 5.34 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबारास सुरुवात झाली. यावर्षी आतापर्यंत पाकिस्तानकडून जवळपास 250 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. तर 2016 मध्ये 228 वेळा पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केले होते. 

स्वातंत्र्यदिनीदेखील सीमारेषेवर गोळीबार 
एकीकडे मंगळवारी भारतात स्वातंत्र दिन साजरा केला जात असताना, दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत होता. मंगळवारी जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टर परिसरात नियंत्रण रेषेजवळील दोन ठिकाणी पाकिस्ताननं गोळीबार केला. यात एक महिला जखमी झाली होती. पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमारेषेपलिकडून करण्यात आलेल्या गोळीबारात हनीफा बेगम नावाची महिला जखमी झाली आहे. 

आणखी बातम्या वाचा
(लडाखमध्ये चिनी सैनिकांची रोखली घुसखोरी)

(सैनिकांनो बंदुकी मोडा अन् काश्मिरींना मिठ्या मारा, सामनातून मोदींवर टीका)
(नायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू, 82 जखमी)
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर यासीन इटूचा एन्काऊंटर
दरम्यान, 12ऑगस्टला दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रात्री झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशवादी संघटनेचा कमांडर यासीन इटू उर्फ गजनवीचा जवानांनी खात्मा केला आहे. यासीन इटूचा खात्मा म्हणजे दहशतवादी संघटनांना मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या चकमकीत महाराष्ट्रातील एका जवानासह दोन जवान शहीद झाले आहेत. अकोल्यातील जवान सुमेध गवई आणि तामिळनाडूतील जवान इलयाराजा पी यांना वीरमरण आले आहे. 
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार
4 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी ठार मारला गेला. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला.  एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली.  मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले. यानंतर एन्काऊंटरमध्ये एका बाईकस्वाराला ठार करण्यात आले. ठार करण्यात आलेला व्यक्ती हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता, असे पोलिसांनी सांगितले. या दहशतवाद्याकडून रायफल,  चिनी हॅण्ड ग्रेनेडसहीत अन्य दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत 3 राष्ट्रीय रायफल्सचे एक जवान जखमी झाला आहे.   
दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद
3 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील शोपियान व कुलगाम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचं नाव आकिब असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर शोपियानमध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यात एक मेजर व दोन जवान शहीद झाले आहेत.   दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीननं शोपियान हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. यात अल्ताफ खुचरू सामिल होता, असे वृत्त समोर आले आहे. तो टॉप हिजबुल कमांडर असल्याचे बोलले जात आहे. 

लष्कर-ए-तोयबाच्या अबू दुजानाचा खात्मा
1 ऑगस्ट रोजी भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबू दुजाना आणि त्याचा साथीदार आरिफचा एन्काऊंटर केला. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जातात. 
 


Web Title: The fierce reply to the firing of the Karachi Pakistan fighter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.