अंतिम वर्षांच्या परीक्षा की सरासरी गुण? सर्वोच्च न्यायालय आता १० ऑगस्टला करणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 12:53 PM2020-07-31T12:53:20+5:302020-07-31T12:56:06+5:30

कोरोनाचा संसर्ग फैलावत असताना अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात की न घ्याव्यात यावरून बराच खल झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.

Final year exams or average marks? The Supreme Court will now hold a hearing on August 10 | अंतिम वर्षांच्या परीक्षा की सरासरी गुण? सर्वोच्च न्यायालय आता १० ऑगस्टला करणार सुनावणी

अंतिम वर्षांच्या परीक्षा की सरासरी गुण? सर्वोच्च न्यायालय आता १० ऑगस्टला करणार सुनावणी

Next

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे यावर्षी देशातील अनेक विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात की न घ्याव्यात यावरून बराच खल झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालाने यावर सुनावणी करताना याबाबतची सुनावणी १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका कायम असल्याने काही विद्यापीठे आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील सरकारांनी यावर्षी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. तसेच यावर्षी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची योजना आखली होती. मात्र यूजीसी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत आग्रही होती. तसेच सप्टेंबरनंतर परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे यूजीसीने सांगितले आहे. दरम्यान, आता या प्रकरणावरील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

Read in English

Web Title: Final year exams or average marks? The Supreme Court will now hold a hearing on August 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.