LOC वर पाकिस्तानचा हल्ला लष्कराने पाडला हाणून, BAT च्या दोन कमांडोंना कंठस्नान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 09:19 AM2018-12-31T09:19:39+5:302018-12-31T09:30:36+5:30

नववर्षापूर्वी भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे.

Foiled a major BAT attempt to strike a forward post along LoC | LOC वर पाकिस्तानचा हल्ला लष्कराने पाडला हाणून, BAT च्या दोन कमांडोंना कंठस्नान 

LOC वर पाकिस्तानचा हल्ला लष्कराने पाडला हाणून, BAT च्या दोन कमांडोंना कंठस्नान 

Next
ठळक मुद्देनववर्षापूर्वी भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला नौगाम विभारातील नियंत्रण रेषेवर लष्कराने पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) च्या कारवायांना सुरुंग लावताना दोन घुसखोरांना ठार मारलेमोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त

श्रीनगर -  नववर्षापूर्वी भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. रविवारी नौगाम विभारातील नियंत्रण रेषेवर लष्कराने पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) च्या कारवायांना सुरुंग लावताना दोन घुसखोरांना ठार मारले. तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. 

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी BAT ची पथके मोठ्या प्रमाणात दारुगोळा घेऊन नियंत्रण रेषेजवळील जंगलात येत आहेत. तसेच त्यांना कव्हर करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात येत आहे. 





 एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी भारतीय लष्कराने पाकिस्तानी BAT पथकाचा हल्ला परतवून लावला. तसेच या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या दोन जवानांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे  आणि दारुगोळा जप्त करण्यात आळा आहे. 

ठार मारण्यात आलेल्या घुसखोरांनी लष्करी गणवेश परिधान केला होता. तसेच त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर सामान होते. तसेच शस्त्रास्त्रेही होती. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले सामान पाहता ते भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याच्या इराद्याने आले होते, हे स्पष्ट होते, अशे लष्कराकडून सांगण्यात आले. 





या घुसखोरांना भारतात घुसण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून मदत देण्यात येत होती. त्यामुळे त्यांचे मृतदेह पाकिस्तानने परत न्यावेत, असे आवाहन करण्यात येणार असल्याचेही लष्कराकडून सांगण्यात आले.  



 

Web Title: Foiled a major BAT attempt to strike a forward post along LoC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.