गरबा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचं करा- हिंदू उत्सव समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 10:25 AM2017-08-18T10:25:11+5:302017-08-18T12:45:44+5:30

नवरात्रौ उत्सवादरम्यान होणा-या गरबामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. शिवाय, यासाठी आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदू उत्सव समिती (HUS) नावाच्या संस्थेनं केली आहे.

Force Aadhaar card for Garba Access - Hindu Utsav Committee | गरबा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचं करा- हिंदू उत्सव समिती

गरबा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचं करा- हिंदू उत्सव समिती

Next

नवी दिल्ली, दि. 18 - नवरात्रौ उत्सवादरम्यान होणा-या गरबामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. शिवाय, यासाठी आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदू उत्सव समिती (HUS) नावाच्या संस्थेनं केली आहे.  इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, गरबामध्ये अनेकदा हिंदू नसलेली लोकं येतात व ते हिंदू मुलींनी स्वतःकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न करतात, असे समितीचे म्हणणे आहे. एकूणच गरबामध्ये मुस्लिमांना प्रवेश मिळू नये, यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्याची बाब संस्थेचं अध्यक्ष कैलास बेगवानी यांनी मान्य केली आहे. भोपळमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत संस्थेनं गरबामध्ये आधार कार्ड सक्ती करण्यात यावी, अशी   मागणी केली आहे.  

बेगवानी यांनी समितीच्या मागणीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, ''निवडणूक ओळख पत्र किंवा अन्य कागदपत्रांप्रमाणे बनावट आधार कार्ड तयार करणे सोपे नाही. गरबामध्ये प्रवेशावेळी आधार कार्ड दाखवले तर त्याच्या ओळखीबाबत कोणतीही शंका उपस्थित होणार नाही''. ''उत्सवानंतर हिंदू मुलींचे इतर धर्मातील लोकांकडून शोषण झाल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. हिंदू नसलेली लोकं उत्सवादरम्यान हिंदू मुलींशी मैत्री करतात. त्यांना स्वतःकडे आकर्षित करतात'', असेही त्यांनी सांगितले.
हिंदू उत्सव समितीनं आपली ही मागणी जिल्हा प्रशासनाद्वारे बोलवण्यात आलेल्या  शांतता बैठकीत मांडली. मात्र, जिल्हा प्रशासननं हिंदू उत्सव समितीला याबाबत कोणतेही आश्वासन अद्यापपर्यंत दिलेले नाही. या समितीत 6 हजार सदस्य आहेत. काही दशकांपूर्वी ही समिती होळी आणि दसरा यांसारख्या उत्सव साजरे करत होती, मात्र गरबाचे कधीही आयोजन केलेले नव्हते. दरम्यान, बैठकीत समितीतर्फे आणखी काही मागण्या करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वात मांस विक्री आणि दारुची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, या मागण्यांचे निवेदनही समितीने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. बेकायदा मांस वाहतूक करणाऱ्यांविरोधातही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. गणेश मूर्तीची उंची 9 फुटांपेक्षा जास्त नको, अशी मागणीही केली होती. पण नियोजन समितीने ती फेटाळली. जी मंडळं ऊंच मूर्ती बनवत आहेत त्यांनी यामुळे कोणतेही दुर्घटना घडल्यास त्यास आयोजक जबाबदार असतील असा बॉन्ड द्यावा, अशी मागणी हिंदू उत्सव समितीनं केली होती. 

Web Title: Force Aadhaar card for Garba Access - Hindu Utsav Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.