अधिवेशन....भोगवटा प्रमाणपत्रासाठी काल मर्यादा ठेवा गोपीकिसन बाजोरिया यांनी मांडली लक्षवेधी
By Admin | Published: December 18, 2014 12:40 AM2014-12-18T00:40:30+5:302014-12-18T00:40:30+5:30
नागपूर : अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत येणार्या इमारती, बैठी घरे, दुकानदार, हॉटेल्स आदिंकडे भोगवटा प्रमाणपत्रांची मनपाकडून वारंवर मागणी होत आहे. त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्रासाठी काही कालमर्यादा ठरविण्याची मागणी आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी लक्षवेधी मांडून केली.
न गपूर : अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत येणार्या इमारती, बैठी घरे, दुकानदार, हॉटेल्स आदिंकडे भोगवटा प्रमाणपत्रांची मनपाकडून वारंवर मागणी होत आहे. त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्रासाठी काही कालमर्यादा ठरविण्याची मागणी आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी लक्षवेधी मांडून केली. अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत येणार्या इमारती, बैठी घरे, दुकानदार, हॉटेल्स आदिंकडे भोगवटा प्रमाणपत्रांची होत असलेली मागणी, सदर मागणी करण्यापूर्वी यासंदर्भात पूर्वसूचना न देता करण्यात येत असलेली कारवाई, दुकानदार व हॉटेल्स मालकांनी पालिकेच्या अटी शर्तीनुसार लागणारी सर्व राहत्वाची प्रमाणपत्रे घेतलेली असतानाही अकोला महाननगरपालिकेच्या हद्दीतील सर्व इमारतींकडे भोगवटा प्रमाणपत्राची तसेच दुकान व हॉटेल्स मालकाकडून विविध प्रमाणपत्राची मागणी होत आहे. भोगवटा प्रमाणपत्र सादर न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता रात्री अपरात्री कारवाई करून त्याच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. तसेच काही हॉटेल्स सील करण्यात येत आहेत. अकोला महानगरपालिका स्थापित होवून ४० वर्षांचा कालावधी उलटला असून, अशाप्रकारे भोगवटा प्रमाणपत्राची मागणी यापूर्वी करण्यात आलेली नव्हती. आता अचानक मागणी केल्यामुळे स्थानिक रहिवाशी, दुकानदार, हॉटेल मालक यांच्यात पसरलेलेे असंतोषाचे वातावरण, याकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शासनाने गांभिर्याने लक्ष घालून भोगवटा प्रमाणपत्रासाठी कालमर्यादा ठरविण्याची नितांत गरज असल्याचे मत ंआ. बाजोरिया यांनी लक्षवेधीमध्ये व्यक्त केले.