Jammu And Kashmir : हंदवाडा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 11:47 AM2019-03-03T11:47:28+5:302019-03-03T11:53:22+5:30
जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये तीन दिवसांपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारपासून हंदवाडा परिसरात चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
#UPDATE Handwara encounter: Two terrorists have been killed, operation in progress. Five security personnel have lost their lives in the encounter which has been going on for the last three days. #JammuAndKashmirpic.twitter.com/fAExyhOjvO
— ANI (@ANI) March 3, 2019
जम्मू-काश्मीरमधील हंदवाडामध्ये चकमक सुरुच; दहशतवादी लपल्याची माहिती
जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा आणि बाबागुंड परिसरात सलग तिसऱ्या दिवशी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत पाच जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हंदवाडा परिसरात गेल्या गुरुवारपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. परिसराला सुरक्षा दलाच्या जवानांनी वेढा घातला असून शोधमोहीम सुरु आहे. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचारी शहीद झाले आहेत. तर नऊ जवान जखमी झाले असून यामध्ये दोन सीआरपीएफचे जवान आहेत आणि सात लष्कराचे जवान आहेत.
The encounter between terrorists and security forces in Babagund, Handwara area enters third day. Two CRPF personnel and two Jammu and Kashmir police personnel have lost their lives so far. Operation underway. pic.twitter.com/D5rIaSC2Tw
— ANI (@ANI) March 3, 2019
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे.