हनुमान मुसलमान होते, भाजपाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 05:17 PM2018-12-20T17:17:08+5:302018-12-20T17:19:17+5:30

रामभक्त हनुमानाच्या जातीवरुन सुरू झालेला वाद संपुष्टात येण्याचं नाव घेत नाहीय. यासंदर्भात आता भाजपाचे आमदार बुक्कल नवाब यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

Hanuman ji Was In Fact Muslim, Claims BJP MLC Bukkal Nawab | हनुमान मुसलमान होते, भाजपाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान

हनुमान मुसलमान होते, भाजपाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान

googlenewsNext

नवी दिल्ली - रामभक्त हनुमानाच्या जातीवरुन सुरू झालेला वाद संपुष्टात येण्याचं नाव घेत नाहीय. यासंदर्भात आता भाजपाचे आमदार बुक्कल नवाब यांनी वादग्रस्त विधान केले आहे. हनुमान मुस्लिम होते, असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे.  

बुक्कल नवाब यांचे विधान 
''हनुमानजी हे मुसलमान होते, असे आमचे मानने आहे. यामुळे मुसलमानांमध्ये  रहमान, रहमान, रमजान, फरमान, जीशान, कुर्बान अशी जी काही नावं ठेवली जातात. ती जवळपास हनुमानाच्याच नावावरुन ठेवण्यात येतात. त्यांच्या नावाशी मिळती-जुळती नावं ठेवली जातात'', असे विधान नबाव यांनी केले आहे. 



काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामभक्त हनुमान दलित आणि वंचित होते, असा शोध लावला होता. "बजरंगबली असे लोकदैवत आहेत जे वनवासी, दलित आणि वंचित आहेत'', असे विधान त्यांनी केले होते.  याप्रकरणी, उत्तर प्रदेशातील एका संघटनेनं योगी आदित्यनाथ यांना माफी मागण्यास सांगत नोटिसही बजावली होती. 

Web Title: Hanuman ji Was In Fact Muslim, Claims BJP MLC Bukkal Nawab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा