हॅशटॅग आता मराठीतही!
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:56+5:302015-02-14T23:50:56+5:30
हॅशटॅग आता मराठीतही!

हॅशटॅग आता मराठीतही!
ह शटॅग आता मराठीतही!मुंबई : सेलिब्रिटी आणि दिग्गजांद्वारे वारंवार केले जाणारे ट्वीट आणि त्यातून अनेकदा निर्माण होणारे वाद यामुळे सर्वसामान्यांमध्ये देखील टिष्ट्वटरविषयी लोकप्रियता वाढली आहे. त्यादृष्टीने टिष्ट्वटरनेही आपले फिचर्स अधिक सर्वसमावेशक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. टिष्ट्वटरवर आतापर्यंत केवळ इंग्रजीत हॅशटॅग करता येत होते, मात्र आता मराठीत सुद्धा हॅशटॅग करता येणार आहे.ट्विटरने प्रादेशिक भाषांमध्ये हॅशटॅग सुरू केले आहे. त्यामुळे टिष्ट्वटर युझर्स फक्त इंग्रजीमध्येच नाही, तर हिंदी, मराठी आणि बंगाली अशा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये हॅशटॅग करू शकतात.ट्विटरमधील मराठी हॅशटॅग हा हॅश चिन्हापुढे जागा न सोडता सलग लिहिता येणार आहे. हॅशटॅग दिल्याने एक क्लिकेबल लिंक तयार होते. ज्यामुळे तो शब्द हॅशटॅग केलेल्या पोस्ट एकाच वेळी एका खालोखाल एक पाहता येऊ शकतात. एखादा हॅशटॅग जास्तीत जास्त वापरला गेल्यास तो टिष्ट्वटरवरील ट्रेंड बनतो. हॅशटॅगमध्ये केवळ अक्षर आणि अंकाचा वापर करता येतो. हॅश चिन्ह सोडल्यास बाकी कोणत्याही चिन्हाचा हॅशटॅग करता येत नाही. (प्रतिनिधी)....................................