हॉकर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची दादागिरी बहिणाबाई उद्यानाजवळील हॉकर्सचे स्थलांतर: चिठ्ठ्या न टाकता सोयीने बळकावल्या जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 10:26 PM2016-03-11T22:26:49+5:302016-03-11T22:26:49+5:30

मा.कुळकर्णीसाहेबयांच्याकडेद्यावे/जळगाव: मनपाने प्रमुख रहदारीचे रस्ते मोकळे करण्याची मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून बहिणाबाई उद्यानालगतचे तसेच भास्करमार्केटजवळील हॉकर्सचे बहिणाबाई उद्यानामागील बाजूला स्थलांतर शुक्रवारी करण्यात आले. मात्र यावेळी हॉकर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी दादागिरी करीत स्वत:साठी सोयीच्या जागा बळकावल्या. त्यामुळे पाणपोयीच्या बाजूने असलेल्या हॉकर्सवर अन्याय झाल्याची तक्रार त्यांनी केली. या स्थलांतरावेळी वाद होऊन हॉकर्स युनियनचे पदाधिकारी सुनील सोनार यांच्या भावाने मनपा अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍याला कानशिलात लगावल्याने तसेच नंतर बाहेरचे काही गुंड दादागिरी करण्यासाठी आणल्याने वाद निर्माण झाला होता.

Hawkers Association's office bearers dodagiri transfer of Hawkers near Bahinabai garden: | हॉकर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची दादागिरी बहिणाबाई उद्यानाजवळील हॉकर्सचे स्थलांतर: चिठ्ठ्या न टाकता सोयीने बळकावल्या जागा

हॉकर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची दादागिरी बहिणाबाई उद्यानाजवळील हॉकर्सचे स्थलांतर: चिठ्ठ्या न टाकता सोयीने बळकावल्या जागा

Next
.कुळकर्णीसाहेबयांच्याकडेद्यावे/जळगाव: मनपाने प्रमुख रहदारीचे रस्ते मोकळे करण्याची मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून बहिणाबाई उद्यानालगतचे तसेच भास्करमार्केटजवळील हॉकर्सचे बहिणाबाई उद्यानामागील बाजूला स्थलांतर शुक्रवारी करण्यात आले. मात्र यावेळी हॉकर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी दादागिरी करीत स्वत:साठी सोयीच्या जागा बळकावल्या. त्यामुळे पाणपोयीच्या बाजूने असलेल्या हॉकर्सवर अन्याय झाल्याची तक्रार त्यांनी केली. या स्थलांतरावेळी वाद होऊन हॉकर्स युनियनचे पदाधिकारी सुनील सोनार यांच्या भावाने मनपा अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍याला कानशिलात लगावल्याने तसेच नंतर बाहेरचे काही गुंड दादागिरी करण्यासाठी आणल्याने वाद निर्माण झाला होता.
शुक्रवारी सकाळी अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम. खान हे कर्मचार्‍यांसह बहिणाबाई उद्यानाजवळ हॉकर्स स्थलांतरासाठी गेले. उद्यानाच्या पुढच्या बाजूने लागणार्‍या हॉकर्सच्या गाड्या महामार्गाकडील बाजूने लावण्याची कार्यवाही सुरू केली. यावेळी वरिष्ठांच्या आदेशाने सलमान भिस्ती हा कर्मचारी सोनार यांच्या भावाची संजू सोनार याची चाटची गाडी लोटून पुढील बाजूने आणण्याचा प्रयत्न करीत असताना गाडी मालकाने येऊन त्याला मारहाण केली. त्यावेळी इतर कर्मचारी मधे पडल्याने वाद झाला. त्यामुळे संजू याने बाहेरून आणखी दोन-चार माणसे बोलविली. त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सायंकाळीही हॉकर्स युनियनचे दिनेश हिंगणे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी हरिश सोनवणे यांच्याशी वाद घालत टॉवरच्या पुढे कारवाई करायला भिती वाटते का? फुले मार्केटमध्ये कारवाई करून दाखवा असे सांगत वाद घातल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष: जागा बकाळवल्या
पाठीमागील जागेवर स्थलांतर करताना चिठ्ठ्या पाडून जागा देणे आवश्यक असताना मनपा प्रशासनाने सोयीस्करपणे त्यातून अंग काढून घेतले. त्यामुळे हॉकर्स युनियनच्या पदाधिकार्‍यांनी दादागिरी करीत स्वत: सोयीची जागा पटकावली.
इन्फो-आयुक्तांनी टाळले उद्घाटन
स्थलांतराच्या ठिकाणी वाद होऊनही गाड्या लावण्यात आल्या. आयुक्त संजय कापडणीस यांच्या हस्ते सायंकाळी साडेपाच वाजता या ठिकाणी नारळ वाढवून या हॉकर्सच्या नवीन जागेतील व्यवसायाचा शुभारंभ करण्यात येणार होता. मात्र आयुक्तांनी नंतर चक्कर मारतो, असेसांगत उपायुक्तांना पाठवितो, असे सांगितले. मात्र उपायुक्तांनीही येणे टाळत सहायक अभियंता सुनील भोळे यांना तेथे पाठविले. मनपा प्रशासन हॉकर्सचे स्थलांतर करताना आहे त्या जागेवरून हटवित आहे. मात्र नवीन जागेवर स्थलांतर करताना मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळे हॉकर्सने नाराजी व्यक्त केली. सायंकाळी उशीरा आयुक्तांनी या ठिकाणी भेट देऊनपाहणीकेली.

Web Title: Hawkers Association's office bearers dodagiri transfer of Hawkers near Bahinabai garden:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.