...त्याने पत्नीसोबत सेक्स करताना केलं लाईव्ह प्रक्षेपण
By Admin | Published: April 14, 2017 08:04 AM2017-04-14T08:04:04+5:302017-04-14T08:04:04+5:30
एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या पत्नीसोबतील खासगी क्षणांना लॅपटॉपच्या सहाय्याने पॉर्न साईटवर लाईव्ह टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 14 - एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या पत्नीसोबतील खासगी क्षणांना लॅपटॉपच्या सहाय्याने पॉर्न साईटवर लाईव्ह टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या विकृत पतीला अटक केली आहे. गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेल्या या पतीला न्यायालयीन कोठडीत पाठण्यात आलं आहे.
पीडीत महिला नोकरी करत असून नोव्हेंबर 2016 रोजी तिच्या एका मैत्रीणीने पॉर्न साईटवर तुझा व्हिडीओ असल्याची माहिती दिल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. यावेळी या सर्व प्रकारामागे आपला पती असेल याची तिला साधी कल्पनाही नव्हती.
पोलिसांनी तपास सुरु केला असता थिसूरमधील एक आरोपी त्यांच्या हाती लागला ज्याने पॉर्न साईटवर लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून हा व्हिडीओ रेकॉर्ड करत दुस-या पॉर्न साईटवर अपलोड केला होता. पोलिसांनी आरोपीची चौकशी आणि व्हिडीओची तपासणी केली असता दांपत्याच्या बेडरुममध्ये लॅपटॉप कॅमे-याच्या सहाय्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचं निष्पन्न झालं.
"दांपत्य लॅपटॉपवर चित्रपट पाहत असताना पतीने लॅपटॉप कॅमे-याच्या सहाय्याने सेक्स व्हिडीओची रेकॉर्डिग केली. लॅपटॉपवर चित्रपट सुरु असल्याने हा प्रकार पत्नीच्या लक्षात आलं नाही", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
"आपल्या पत्नीने लॅपटॉपकडे पाहावं जेणेकरुन दर्शकांना तिचा चेहरा नीट दिसावा यासाठी आरोपी पतीने लॅपटॉपवर चित्रपट सुरु केला, आणि दुस-या बाजूला वेब कॅम सुरु असल्याची खात्री करुन घेतली", असं पोलीस अधिका-याने सांगितलं आहे. आरोपी पतीचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
"लॅपटॉपची तपासणी केली असताना आरोपी वारंवार पॉर्न साईट पाहत असल्याचं समोर आलं आहे. तसंच अनेक पॉर्न स्ट्रिमिंग साईट्स आणि एस्कॉर्ट सर्व्हिस साईट्सवर त्याचं खातंही आहे", अशं सायबर क्राईमचे एसीपी एस जयराम यांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपी पतीने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपीने लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी लॅपटॉपचा आधार घेतला होता सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक पुरावेही जमा केले आङेत. अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ पॉर्न साईट्सवरुन डिलीट करण्यात आले आहेत.