"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 07:36 PM2024-05-12T19:36:04+5:302024-05-12T19:37:14+5:30
टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
एका टीएमसी नेत्याचे म्हणणे आहे की, ते हिंदूंना भागीरथी नदीत फेकून देतील. त्यांच्यात एवढं बोलण्याची हिंमत कुठून येते? त्यांचे समर्थन कोण करत आहे? टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते ते बराकपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते.
एएनआय ने दिलेल्या वृत्तानुसार, बराकपूरमधील सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, "भाजपला 2019 च्या तुलनेत मोठा जनादेश मिळणार, असे लोकांचे उत्साही चेहरे सांगतात. बंगाल "फिर एक बार, मोदी सरकार!", असे म्हणत आहे. टीएमसीने बंगालमध्ये बॉम्ब बनवण्याला कुटीर उद्योग बनवले आहे. आज सामान्य माणसाला बंगालमध्ये आस्थेचे पालन करणेही कठीण झाले आहे.
काय देश तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि डाव्यांच्या हातात सोडायला हवा? -
पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा बंगालमधील लोक श्री रामाचे नाव घेतात तेव्हा टीएमसी त्यांना धमकावते. टीएमसी लोकांना जय श्रीराम म्हणण्याची परवानगी देत नाही. तर दुसरीकडे रामनवमी साजरी करण्यासाठी, काँग्रेसही राम मंदिराच्या विरोधात उभी आहे. आपण देश टीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांच्या हातात सोडाय हवा?
TMC नेत्याच्या वक्तव्यावरून मोदींचा म्हणाले, एवढं बोलण्याची हिंमत कुठून येते? -
सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, एका टीएमसी नेत्याचे म्हणे आहे की, ते हिंदूंना भागीरथी नदीत फेकून देतील. त्यांच्यात एवढं सारं बोलण्याची हिंमत कुठून येते? त्यांचे समर्थन कोण करत आहे? टीएमसीची राजवट लोकांना रामाचे नाव घेऊ देत नाही, रामनवमीही साजरी करू देत नाही." एवढेच नाही तर, "टीएमसीच्या राजवटीत बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ममता सरकारवर केला.
काय म्हणाले होते TMC आमदार हुमायूं कबीर? -
तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबाद येथील एका प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, हिंदूंना दोन तासांत भागीरथी नदीत बुडवून टाकले जाईल, अन्यथा राजकारण सोडू. ते भरतपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.