हनीप्रीत नेपाळच्या मोरांग शहरात?, ४३ जण मोस्ट वाँटेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:10 AM2017-09-19T04:10:26+5:302017-09-19T04:10:30+5:30
चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला शिक्षा सुनाविल्यानंतर पंचकुला, सिरसा व हरयाणाच्या अन्य भागांत झालेल्या हिंसाचारप्रकरणी हरयाणा पोलिसांनी ४३ जणांची मोस्ट वाँटेड लिस्ट काढली असून, त्यात हनीप्रीतचे नाव सर्वात वर आहे. ती नेपाळमध्ये पळून गेल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे.
या यादीत डेराचा प्रवक्ता आदित्य इन्सा हाही असून, ते दोघे फरार आहेत. शिक्षेनंतर राम रहीमला न्यायालयातून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप हनीप्रीतवर आहे. डेराचा कार्यकर्ता प्रदीप गोयल इन्सा आणि प्रवक्ता आदित्य इन्साचा नातेवाईक प्रकाश यांना आधीच अटक झाली आहे.
हनीप्रीत बिहारमार्गे नेपाळमध्ये पळून गेल्याची पोलिसांची खात्री पटली असून, तेथील मोरांग शहरात ती आहे, असे सांगण्यात येते. तिथे तिला काहींनी पाहिले असल्याचे सांगण्यात आले. हनीप्रीतविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
हल्लेखोरांची छायाचित्रे उपलब्ध
पंचकुलामध्ये हिंसा पसरविण्याचा आरोप असलेल्यांची ही जी यादी आहे, त्यात माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवले ठेवले जाईल. त्यांची माहिती घेण्यासाठी विशिष्ट फोन नंबर, व्हॉट्सअॅप नंबर आणि ईमेल आयडी प्रसिद्ध केले जाणार आहेत.
सिरसामध्ये हिंसा पसरविणाºयांची माहिती फोटोग्राफ आणि व्हिडीओद्वारे घेण्यात आली आहे. छायाचित्रे व व्हिडीओमध्ये हल्लेखोर शस्त्र घेऊन दिसत आहेत. काहींचे चेहरे झाकलेले आहे.