माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:02 AM2024-05-05T06:02:26+5:302024-05-05T06:03:00+5:30

पुरी मतदारसंघात पक्षाच्या अडचणी वाढल्या

I have no money, I cannot contest; Expressing displeasure, the Congress candidate returned the ticket | माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत

माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत

भुवनेश्वर : ओडिशामध्ये पुरी मतदारसंघातील काॅंग्रेसच्या उमेदवार सुचरिता माेहंती यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. निवडणूक लढण्यासाठी पुरेसा निधी नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. 

सुचरिता यांनी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगाेपाल यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. सुचरिता या पत्रकार हाेत्या. १० वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पक्षाने निधी दिल्याशिवाय प्रचारमाेहिम अशक्य आहे. पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ७ मतदारसंघापैकी काही ठिकाणी दुबळे उमेदवार दिले आहेत. अशा पद्धतीने मी निवडणूक लढू शकत नाही, असे सुचरिता यांनी म्हटले आहे. 

यापूर्वीही दिले हाेते तिकीट
पुरी येथून भाजपने संबित पात्रा यांना तर राज्यातील सत्ताधारी बीजेडीने मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त अरुप पटनायक यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत पात्रा हे १२ हजार मतांनी पराभूत झाले हाेते. काॅंग्रेसने २०१४मध्येदेखील सुचरिता यांना उमेदवारी दिली हाेती. या जागेवर १९९८पासून बीजेडीने विजय मिळविला आहे. 

काॅंग्रेस बदलणार उमेदवार
nओडिशाचे प्रभारी अजाॅय कुमार यांनी मला स्वत:च्या बळावर निवडणूक लढविण्याचे खासकरुन सांगितल्याचे सुचरिता यांनी म्हटले आहे. 
nतर अजाॅय कुमार यांनी सुचरिता यांचा दावा खाेडून काढताना सांगितले की, पक्षाने आमदारकीसाठी सर्वाेत्तम उमेदवारांची निवड केली आहे. गांभीर्याने लढतील, त्यांना पक्षाकडून निधी पुरविण्यात येईल.
nत्यांनी तिकीट मागितले त्याचवेळी त्या म्हणाल्या हाेत्या की त्या गांभीर्याने लढतील. आम्ही पुरी येथील उमेदवार बदलण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला हाेता.

Web Title: I have no money, I cannot contest; Expressing displeasure, the Congress candidate returned the ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.