रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 09:45 AM2017-08-17T09:45:21+5:302017-08-17T09:58:57+5:30
ईदच्या वेळी रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून मला रोखता येत नसेल तर, पोलीस स्थानकातही जन्माष्टमी साजरी करण्यापासून मी कोणाला रोखू शकत नाही.
लखनऊ, दि. 17 - ईदच्या वेळी रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून मला रोखता येत नसेल तर, पोलीस स्थानकातही जन्माष्टमी साजरी करण्यापासून मी कोणाला रोखू शकत नाही असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. आधीच्या समाजवादी पार्टीच्या सरकारला टोला लगावताना स्वत:ला यदुवंशी म्हणवणा-यांनी पोलीस स्थानकात जन्माष्टमी साजरी करण्यावर बंदी घातली होती असे ते म्हणाले. योगींच्या या विधानावरुन नवीन वाद होण्याची शक्यता आहे.
प्रेरणा जनसंचारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसांबळेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या भाषणात आदित्यनाथांनी कावड यात्रेचाही संदर्भ दिला. अधिका-यांनी जेव्हा मला कावड यात्रेमध्ये माईक, डीजे आणि म्युझिक सिस्टीम वापरण्याला मनाई केल्याचे सांगितले. त्यावेळी मी त्यांना सर्वच ठिकाणी माईकवर बंदी घालता येऊ शकते का? कुठल्याही धर्मस्थळामधून माईकाचा आवाज बाहेर येणार नाही हे सुनिश्चित करता येईल का? असा प्रतिप्रश्न केला. जर अशा प्रकारे आपल्याला बंदीची अंमलबजावणी करता येत नसेल तर, यात्रा नेहमीसारखी चालू राहिल असे मी त्यांना सांगितले.
आणखी वाचा
राजौरीजवळच्या नियंत्रण रेषेवर जम्मू-काश्मीर सरकार बनवतंय 100 बंकर्स
मराठवाड्यातील २५०० कुटुंबांचे स्थलांतर!
मी अधिका-यांना म्हटले की, कावड यात्रा आहे की, शव यात्रा ? कावड यात्रेत बाजा, डमरु, ढोल, चिमटे वाजणार नाहीत, लोक गाणार, नाचणार नसतील तर, ती कावड यात्रा कसली ?देशात प्रत्येकाला आपले सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही ख्रिसमसही साजरा करा असे योगी म्हणाले. भारतात कधीही कोणाला थांबवलेले नाही. कायद्याचे पालन करुन नमाज पठण करा. कायद्याचे उल्लंघन होणार असेल तर संघर्ष होणारच असे योगी म्हणाले.
शिवाजी महाराज खरे हिरो, बाबर, अकबर घुसखोर - योगी आदित्यनाथ
मुघल शासक बाबर आणि अकबर घुसखोर होते. त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही. हे लोकांनी मान्य केल्यास देशातील समस्या सुटण्यास सुरुवात होईल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका कार्यक्रमात म्हणाले. ज्या राज्याकडे, समाजाकडे आपल्या इतिहासाचे संवर्धन करण्यास वेळ नाही तो प्रदेश आपल्या भूगोलाचे संरक्षण करु शकत नाही असे आदित्यनाथ म्हणाले.
महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग हे आपल्या देशाचे खरे हिरो आहेत. त्यांचा सन्मान झाला पाहिजे असे आदित्यनाथ म्हणाले.