सत्तेत आल्यास NEET परिक्षेत बिनधास्त कॉपी करा , आमदाराची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 07:59 PM2018-02-07T19:59:50+5:302018-02-07T20:01:00+5:30
राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची आश्वासनं देत असतात पण कधीकधी मतं मिळवण्यासाठी सर्व कायदे धाब्यावर बसवले जातात.
तिरुअनंतपुरम : राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची आश्वासनं देत असतात पण कधीकधी मतं मिळवण्यासाठी सर्व कायदे धाब्यावर बसवले जातात. अशीच घटना तामिळनाडूमध्ये पाहायला मिळत आहे. येथे माजी मंत्री आणि डीएमके पक्षाचे आमदार के.एन.नेहरू यांनी सत्तेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना NEET परिक्षेत बिनधास्त कॉपी करू दिली जाईल अशी घोषणा केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी होणा-या NEET परिक्षेतून सूट मिळावी अशी मागणी करणा-या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी नेहरू यांनी ही घोषणा केली. जर NEET परिक्षेतून सूट मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो तर आमचं सरकार आल्यास आम्ही विद्यार्थ्यांना खुलेआम कॉपी करण्यास परवानगी देऊ असं नेहरू म्हणाले. तुम्ही बिहार-मध्य प्रदेशमध्ये खुलेआम कॉपी करू देतात, असं का? केवळ तमिळ लोकं कधीपर्यंत इमानदार राहतील असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना विचारला. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.
काय आहे प्रकरण-
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी होणा-या NEET परिक्षेतून सूट मिळावी अशी मागणी तामिळनाडूचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत. अनेक दिवसांपासून हा मुद्या येथे चर्चेत अशून राज्यातील विविध भागांत त्यासाठी विरोध प्रदर्शनं देखील सुरू आहेत.
सध्या तामिळनाडूत एआयडीएमकेचं सरकार असून डीएमके तेथे विरोधी पक्ष आहे.
If we were unable to get exemption in #NEET, we would certainly allow cheating for students if we were in power. You allow copying in Bihar,MP and its all done openly. Why? For how long will Tamilians remain honest?: KN Nehru,DMK MLA and former TN Minister (5.2.18) pic.twitter.com/YXANdEYxJ3
— ANI (@ANI) February 6, 2018