ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या जिन्यात आग गेंट्याल टॉकीज येथील घटना : पाण्याचा मारा केल्याने अनर्थ टळला
By admin | Published: July 12, 2015 11:56 PM2015-07-12T23:56:34+5:302015-07-12T23:56:34+5:30
सोलापूर : अशोक चौक येथील गेंट्याल टॉकीज जवळील ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या पाठीमागील जिन्यात कागदी पुठ्ठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून ५ हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार दुपारी १.१0 वा. घडला. अग्निशामक दलाने वेळेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
Next
स लापूर : अशोक चौक येथील गेंट्याल टॉकीज जवळील ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या पाठीमागील जिन्यात कागदी पुठ्ठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून ५ हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार दुपारी १.१0 वा. घडला. अग्निशामक दलाने वेळेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या पाठीमागील जिन्यात टीव्ही, रेफ्रिजरेटर आदी इलेक्ट्रिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी इलेक्ट्रिकचा मीटर बोर्ड असून शॉर्टसर्किटमुळे पडलेल्या ठिणगीने कागदी पुठ्ठ्याला आग लागली. आगीमुळे धुराचे लोळ ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या दुसर्या मजल्यावरील गोडावूनमधून बाहेर पडू लागल्याने इमारतीवरील टॉवरला आग लागण्याची अफवा परिसरात पसरली. ओम इलेक्ट्रिकलचे राजेश रामचंद्र महिंद्रकर यांनी तत्काळ अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटना स्थळावर येऊन गोडावूनला पाण्याचा मारा सुरू केला. मात्र आग ही जिन्यात लागल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर जिन्यात पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली. (प्रतिनिधी)कोट....दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या पाठीमागे व गोडावूनच्या मोकळ्या जागेत कागद व टाकाऊ वस्तू ठेवू नये. कोणत्याही कारणास्तव अशा वस्तू पेट घेऊ शकतात याचा मोठा धोका निर्माण होतो. ओम इलेक्ट्रॉनिक्सची आग वेळेत जर आटोक्यात आली नसती तर वर असलेल्या ऑईल पेंटच्या दुकानाला धोका झाला असता. व्यापार्यांनी असा धोका होणार नाही याची काळजी घ्यावी. केदार आवटी, अधीक्षक, अग्निशामक दल.