जागतिक हवामान दिन विशेष : वाढत्या तापमानाचा अन्टार्टिकामधील बर्फावर मोठा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 08:42 PM2018-03-22T20:42:32+5:302018-03-22T20:42:32+5:30
जगभरातील तापमान वाढीचा परिणाम अन्टार्टिकामधील हिमशिखरे आणि बर्फाच्छादीत भागावर सातत्याने होत आहे.
जयंत धुळप
अलिबाग- जगभरातील तापमान वाढीचा परिणाम अन्टार्टिकामधील हिमशिखरे आणि बर्फाच्छादीत भागावर सातत्याने होत असल्याचा निष्कर्ष अन्टार्टिकामधील एक्स्पीडीशनवर असलेले अलिबाग भूचूंबकिय वेधशाळेतील संशोधक सुदर्शन पात्रो यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतला.
स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवरील नैसर्गिक बदलांशी संबधीत असतो याच सुत्रस धरुन बर्फाच्छादित अन्टार्टिका बेटावर तपामानासह अन्य हवामान विषयक घटकांचा अभ्यास करण्याकरिता जगभरातील विविध देशातील संशोधक व अभ्यासकांच्या संशोधन मोहिमा त्यात्या सरकारच्या माध्यमातून दरवर्षी जात असतात. भारताचे स्वत:चे भारती हे संशोधन केंद्र अन्टार्कटिका येथे कायमस्वरुपी असून तेथे सद्यस्थितीत अलिबाग भूचूंबकिय वेधशाळेतील संशोधक सुदर्शन पात्रो हे संशोधन करित आहेत.
तपामानात विक्रमी तफावत, तपमान सुसह्यीकरणाअंती अन्टार्टिकात दाखल
मॅग्नेटोमिटरच्या माध्यमातून पृथ्वीच्या चुंबकीय स्थित्यंतराच्या नोंदी घेवून त्यांचा अभ्यास आमच्या पथकाकडून सुरु असल्याची माहिती सुदर्शन पात्रो यांनी दिली. अन्टार्टिका येथे सध्या असलेले उणे 12 डीग्री तापमान आणि आपल्या देशातील उच्च तापमान असा मोठा फरक येथे आहे. अन्टार्टिकामधील विक्रमी कमी तापमानात जावून, राहून संशोधन कार्यकरण्याकरिता येथे येण्यापूर्वी उत्तराखंड राज्यातील उली या 11 हजार फूट उंचीवरील बर्फाच्छादित क्षेत्रात राहून तपमान सुसह्यीकरण केल्यावर आम्ही येथे दाखल झालो. भारतीय संशोधक चमू बरोबरच रशिया व चिन चे संशोधक देखील येथे असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितलं.
हवामानाच्या नोंदीच्या देवाणघेवाणीला जागतिक स्तरावर प्राधान्य
हवामानातील अनपेक्षीत बदलांमुळे मानवी साधनसंपत्तीचे तर नुकसान होतेच; शिवाय अनेकांचा मृत्यूही ओढवतो. इतर प्राणी-पक्षीही यातून सुटत नाही. हवामानावर लक्ष ठेवणारी ‘वर्ल्ड वेदर वॉच’ ही प्रणाली आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्यरत आहे. हवामानातील बदल, त्यामागील कारणो व उपाय याबाबी सरकारपासून सर्वसामान्यंपर्यंत प्रत्येकाने समजून घेण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे.
सन 1950 साली जागतिक हवामानशास्त्न संघटना स्थापन झाली. ही संस्था स्थापन होण्यासाठी पुढाकार घेण्याऱ्या 31 देशांत भारताचा देखील समावेश आहे. स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवरील नैसर्गिक बदलांशी असतो संशोधनातून स्पष्ट झाल्यावर,जगातल्या सर्व देशांमध्ये केल्या जाणाऱ्या हवामानाच्या नोंदीच्या देवाणघेवाणीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
फोटो सौजन्य- अलिबाग भूचूंबकिय वेधशाळेतील संशोधक सुदर्शन पात्रो (थेट अन्टार्टिकातून)