"अभिनंदन तू जे केलंस ते सर्वांनाच शक्य नाही", हवाई दलाचा अभिनंदन यांच्या धाडसाला सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 09:23 AM2019-03-11T09:23:05+5:302019-03-11T09:27:49+5:30

पाकिस्तानचं एफ-16 लढाऊ विमान पाडल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसावर हवाई दलानं स्तुतिसुमनं उधळली आहेत.

indian air force salutes wing commander abhinandan varthaman with a hindi poem | "अभिनंदन तू जे केलंस ते सर्वांनाच शक्य नाही", हवाई दलाचा अभिनंदन यांच्या धाडसाला सलाम!

"अभिनंदन तू जे केलंस ते सर्वांनाच शक्य नाही", हवाई दलाचा अभिनंदन यांच्या धाडसाला सलाम!

googlenewsNext

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. नंतर त्यांना पकडण्यात आले. भारतील लष्कर, अतिसुरक्षित रेडिओ फ्रिक्वेन्सी (विद्युतचुंबकीय लहरी कंपन) आणि संवेदनशील लॉजिस्टिक (कुमक आणि रसदची व्यूहरचना) ही महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला.

पाकिस्तानचं एफ-16 लढाऊ विमान पाडल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसावर हवाई दलानं स्तुतिसुमनं उधळली आहेत. पोस्टमध्ये लिहिलं आहे की, तू जे केलं अभिनंदन, हे सर्वांनाच शक्य नाही. शिकाऱ्याचीच केली शिकार, हे सर्वच करू शकत नाहीत. एअरफोर्सनं ट्विटरवरून अभिनंदन यांच्यासाठी एक कविताही पोस्ट करण्यात आली होती.


भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ 16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ 16 हे विमान पाडलं होतं. पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग 21 हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते. 
भारतीय हवाई दलाने देशभक्तीपर कविता पोस्ट करून पाकिस्तानला ट्रोल केले होते. 27 फेब्रुवारीला विपीन इलाहाबादी यांनी ही कविता लिहिली होती. 
हद सरहद की

आज किसी ने सरहदें पार की,
क्योंकि किसी ने सारी हदें पार की।
उस लड़ाकू में, जिसका अर्थ मृगमरीचिका है,
एक हक़ीक़त, गयी रात हमने बयाँ की।

आज किसी ने सरहदें पार की,
क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

आज उसके पाले में जा के,
कहा हमने 'हू तू तू तू तू तू'।
और एक ख़ास तरीके से उसे छूकर,
कहा 'अब बस! संभल जा तू'।

आज किसी ने सरहदें पार की,
क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

अब नींद कैसे आएगी उनको,
थोड़ा सा झकझोर आये हैं उनको।
रात जैसे जैसे रवानी पर पहुंचेगी,
आतिशबाजी का रहेगा अंदेशा उनको।

आज किसी ने सरहदें पार की,
क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

अब झूठ कैसे और किससे बोलेंगे वो,
सच की एक ख़ुराक खिला आये हैं उनको।
मियाँ, तुम तुम हो, हम हम हैं,
आज सुबह बता आये हैं उनको।

आज किसी ने सरहदें पार की,
क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

बयाँ की है अपनी मंशा अपनी ज़रा हट के,
हो जाये मुकाबला इस बार चाहे डट के।
आज किसी ने अपनी सरहदें पार कीं,
क्योंकि किसी ने सारी हदें पार कीं।

विपिन 'इलाहाबादी'
२७ फरवरी २०१९



 

Web Title: indian air force salutes wing commander abhinandan varthaman with a hindi poem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.