भारताचे लष्करप्रमुख जनरल डायरसारखे, ज्येष्ठ इतिहासकारांची टीका

By Admin | Published: June 6, 2017 04:53 PM2017-06-06T16:53:30+5:302017-06-06T17:08:51+5:30

काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने उघडलेल्या मोहिमेमुळे दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आहे. मात्र लष्कराने उघडलेल्या

Indian Army Chief General Dyer, like criticism of senior historians | भारताचे लष्करप्रमुख जनरल डायरसारखे, ज्येष्ठ इतिहासकारांची टीका

भारताचे लष्करप्रमुख जनरल डायरसारखे, ज्येष्ठ इतिहासकारांची टीका

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 -  काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने उघडलेल्या मोहिमेमुळे दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आहे. मात्र लष्कराने उघडलेल्या मोहिमेविरोधात काही जणांनी आवाज उठवल्याने यावरून नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेली कारवाई जालियनवाला बाग हत्याकांडासारखी आहे, तर भारताचे लष्कप्रमुख बिपिन रावत यांचे वागणे जनरल डायरसारखे आहे, असे वक्तव्य करत इतिहासकार पार्थ चॅटर्जी यांनी वादाला तोंड फोडले आहे. 
 
1919 साली पंजाबमधीन जालियनवालाबाग येथे जमलेल्या नागरिकांवर ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने बेछूट गोळीबार केला होता. यात शेकडो निष्पाप नागरिक मारले गेले होते. दरम्यान, भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये चालवलेल्या अभियानाची तुलना या हत्याकांडाशी केली आहे. काश्मिरी आंदोलकांविरोधात लष्कराकडून करण्यात येत असलेली कारवाई त्यावेळच्या ब्रिटिशांसारखीच असल्याचे चॅटर्जी यांनी म्हटले आहे.  
 
( कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले मेजर गोगोईंच्या कृतीचे समर्थन )
 
दोन महिन्यांपूर्वी मेजर नितीन लितूल गोगोई यांनी लष्करावर दगडफेक करणाऱ्यांपासून बचाव  करण्यासाठी एका काश्मिरी तरुणाला जीपला बांधून आपल्या तुकडीची सुटका करून घेतली होती. त्यानंतर  मेजर नितीन गोगोई यांना दहशतवादविरोधी कारवाईसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमंडेशनने सन्मानित करण्यात आले होते. मात्र  यांच्या एका युवकाला जीपला बांधून मानवी ढाल बनवण्याच्या कृतीवर फार टीका झाली होती.  गोगोई यांच्यावर मानवाधिकार आणि जिनेव्हा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप लागला होता.  
 
(कश्मिरी तरूणाला जीपला बांधणा-या "त्या" मेजरचा सन्मान)
 
दरम्यान चॅटर्जी यांच्या वक्तव्याबाबत लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. माजी लष्करप्रमुख व्ही.पी. मलिक यांनी चॅटर्जी यांचे हे वक्तव्य धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तर भारतातच अशी माणसं असतील,  आपल्याला पाकिस्ताननसारख्या शत्रूची गरजच नसल्याची संतप्त प्रतिक्रिया कर्नल व्ही.एन. थापर यांनी दिली आहे.  

Web Title: Indian Army Chief General Dyer, like criticism of senior historians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.