Jammu And Kashmir : त्रालमध्ये जवानांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 01:25 PM2019-04-07T13:25:34+5:302019-04-07T14:05:30+5:30
जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये रविवारी (7 एप्रिल) पहाटेपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळत आहे.
श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये रविवारी (7 एप्रिल) पहाटेपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. जवानांनी परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू आहे. या परिसरात जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा दलांच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्राल भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानूसार 42 राष्ट्रीय रायफलचे जवान, सीआरपीएफच्या 180 बटालीयनचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने या परिसराला घेराव घातला आहे. जवानांकडून शोध मोहीम राबविण्यात आली असता दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यावेळी जवानांनी देखील त्यांना उत्तर देत गोळीबार सुरू केला आहे.
Jammu & Kashmir: Encounter broke out between security forces and terrorists at 0725 hours today in Tral, Pulwama; Firing stopped, search underway
— ANI (@ANI) April 7, 2019
शनिवारी (6 एप्रिल) शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या परिसराला घेराव घातला. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबारास सुरुवात झाली. अखेरीस लष्कराने लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. याआधी पुलवामा जिल्ह्यात याच आठवड्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले होते. त्या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्याआधी गेल्या आठवड्याच शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते.
दहशतवाद्यांनी केली सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, कुटुंबीयांसमोरच झाडल्या गोळ्या
काश्मीरमधील सोपोर भागात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद रफी यातू असं या जवानाचे नाव असून त्याच्या कुटुंबीयांसमोर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. रफी हा सुट्टीसाठी त्याच्या सोपोरमधील वारपोरा गावी आला होता.
भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा
पुलवामा येथील लस्सीपुरा भागात काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं असून दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आली होती. लष्कर ए तोएबाच्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. मृत दहशतवाद्यांकडून 2 एके रायफल्स, 1 एसएलआर आणि 1 पिस्तुल जप्त करण्यात आली होती. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 3 जखमी झाले होते तसेच त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू होते.
Jammu and Kashmir : 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना अटक
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली होती. जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षारक्षकांनी रविवारी रात्री ही कारवाई केली. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याची माहिती मिळत होती. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन एका कारमधून तीन जण प्रवास करीत होते. कारच्या तपासणीसाठी या तिघांना श्रीनगरच्या बाहेर परिमपोरा नाक्यावर थांबवण्यात आले. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याचं समोर आलं. तीनही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागात रविवारी (24 मार्च) पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.