लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीत सहभागी झाले तर शरद यादवांवर कारवाई करणार - जेडीयू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 07:06 PM2017-08-19T19:06:47+5:302017-08-19T19:15:05+5:30

27 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या रॅलीत शरद यादव सहभागी होण्याची शक्यता आहे

JD(U) hints at action against Sharad Yadav | लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीत सहभागी झाले तर शरद यादवांवर कारवाई करणार - जेडीयू

लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीत सहभागी झाले तर शरद यादवांवर कारवाई करणार - जेडीयू

Next

पाटणा, दि. 19 - नितीश कुमार यांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्याने नाराज झालेल्या शरद यादव यांच्यावर लवकरच कारवाई केली जाऊ शकते. 27 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या रॅलीत शरद यादव सहभागी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असा अप्रत्यक्ष इशाराच जेडीयूकडून देण्यात आला आहे. 

जेडीयूचे सरचिटणीस के सी त्यागी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे की, 'शरद यादव यांचं पक्षाशी असलेलं जुनं नातं आणि वरिष्ठ नेते असल्याने पक्षविरोधी गोष्टी करुनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र 27 ऑगस्ट रोजी होणा-या लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीत शरद यादव उपस्थित राहिले, तर ते लक्ष्मणरेषा पार करतील'. के सी त्यागी यांनी एकाप्रकारे कारवाई करण्याचा इशाराच दिला आहे. 

शरद यादव यांनी स्वत:हून पक्षा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ना शारिरीक, ना भावनिक कोणत्याही प्रकारे ते आमच्यासोबत नाहीत असंही त्यागी बोलले आहेत. आपले समर्थक आणि आरजेडी सदस्यांसोबत बैठक घेऊन शरद यादव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या असल्याचा आरोप त्यागी यांनी यावेळी केला. 'शरद यादव यांनी नेहमीच नितीश कुमार यांच्याविरोधात भूमिका घेतली. मग ती नोटाबंदी असो, सर्जिंकल स्ट्राईक असो किंवा महिला आरक्षण. दरवेळी त्यांनी नितीश कुमारांविरोधात भूमिका घेतली, आणि अंतिम टोक गाठलं', असंही त्यागी यांनी सांगितलं. 

चार वर्षानंतर नितीश कुमार यांची भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये 'घरवापसी'
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा संयुक्त जनता दलाने भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. चारवर्षानंतर जदयू एनडीएच्या कळपात दाखल झाला आहे. 

चारवर्षांपूर्वी 2013 मध्ये भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव म्हणून जाहीर केल्यानंतर नितीश कुमार यांनी दोन दशकापासूनची भाजपाबरोबरची युती तोडली होती. धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर नितीश यांनी त्यावेळी भाजपाबरोबरची आघाडी तोडली होती.

पण मागच्या महिन्यात बिहारच्या राजकारणात नाटयमय घडामोडी घडल्या. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नितीश यांनी काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल महागठबंधनची साथ सोडून पुन्हा भाजपाबरोबर सरकार स्थापन केले.  

आज नितीश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या  बैठकीत भाजपाप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी नाराज असलेल्या शरद यादव गटातील काही कार्यकर्ते नितीश कुमार यांच्या निवास्थानाबाहेर पोहोचले तिथे त्यांनी एनडीमध्ये सहभागी होण्याचा निषेध करत नितीश यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

Web Title: JD(U) hints at action against Sharad Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.