Naxal Encounter : जवानांच्या चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 15:48 IST2019-02-14T15:46:46+5:302019-02-14T15:48:46+5:30
झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत पीपल्स लिबरेशन फ्रंटचा (पीएलएफआय) एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

Naxal Encounter : जवानांच्या चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा
झारखंड - झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत पीपल्स लिबरेशन फ्रंटचा (पीएलएफआय) एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या नक्षलवादी संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई राबवली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास जवानांनी पीएलएफआयच्या नक्षलवाद्याला कंठस्नान घातले.
रांचीचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) ए.बी.होमकर यांनी कारवाईबाबत माहिती दिली. होमकर म्हणाले की, रनिया पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये गुरूवारी पहाटेच्या सुमारास चमकम उडाली. नक्षलविरोधी मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.
दरम्यान, जवानांनी घटनास्थळावरुन शस्त्रसाठा ताब्यात घेतला असून ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.