केंद्रीय विद्यापीठांमध्ये जेएनयू टॉपवर
By admin | Published: April 5, 2016 12:10 AM2016-04-05T00:10:09+5:302016-04-05T00:10:09+5:30
अलीकडेच वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) पहिले तर संशोधक विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे गाजलेल्या
नवी दिल्ली : अलीकडेच वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) पहिले तर संशोधक विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे गाजलेल्या हैदराबाद विद्यापीठाने केंद्रीय विद्यापीठांमध्ये चौथे स्थान मिळवत आपला दर्जा उच्च श्रेणीतील असल्याचे दाखवून दिले आहे.
आयआयटी मद्रास आणि आयआयएम- बेंगळुरूने तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. देशभरात नावाजलेल्या आयआयटी- खरगपूर या संस्थेने मात्र पहिले रँकिंग गमावले आहे. सरकारने सोमवारी जारी केलेल्या पहिल्या देशांतर्गत मानांकन यादीनुसार तंत्रज्ञान संस्थांमध्ये आयआयटी-मुंबईने दुसरे तर आयआयटी खरगपूर (तृतीय), आयआयटी दिल्ली (चतुर्थ) आणि आयआयटी कानपूर(पाचवे) स्थान मिळविले. औषधशास्त्र शिक्षणात(फार्मसी) मनिपाल फार्मसी महाविद्यालयाने पहिले स्थान मिळविले. राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन चौकटीनुसार ( एनआयआरएफ) चार श्रेणीतील ३५०० संस्थांचे मानांकन निश्चित करण्यात आले असून केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ही यादी जारी केली.1 विद्यापीठ श्रेणींमध्ये राष्ट्रपती पदक मिळविणारे तेजपूर विद्यापीठ पाचवे, दिल्ली विद्यापीठ सहावे, वाराणशीचे बनारस हिंदू विद्यापीठ सातव्या स्थानी राहिले.
2 तिरुवनंतपुरमचे अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान (८), पिलानीची बिर्ला तंत्रज्ञान अािण विज्ञान संस्था(९) तर अलीगड मुस्लिम विद्यापीठाने स्थान मिळविले. अभियांत्रिकी संस्थांमध्ये पहिली दहाही स्थाने आयआयटीने काबीज केली आहेत.