कपिल शर्मा करणार ऑनलाइन कॉमेडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 05:08 PM2017-08-10T17:08:11+5:302017-08-10T17:08:28+5:30
सुनिल ग्रोव्हर आणि अली असगर यांनी द कपिल शर्मा शोला रामराम ठोकल्यामुळे या कार्यक्रमाचा टीआरपी खूपच ढासळला होता. त्यामुळे हा कार्यक्रम बंद होणार असेच सगळ्यांना वाटत होते. पण...
नवी दिल्ली, दि. 10 - सुनिल ग्रोव्हर आणि अली असगर यांनी द कपिल शर्मा शोला रामराम ठोकल्यामुळे या कार्यक्रमाचा टीआरपी खूपच ढासळला होता. त्यामुळे हा कार्यक्रम बंद होणार असेच सगळ्यांना वाटत होते. पण माध्यामांच्या वृत्तानुसार, द कपिल शर्मा शोचा सोनी वाहिनीसोबत असणारा करार या महिन्यात संपुष्टात आला होता. पण सोनी वाहिनीने या कार्यक्रमासोबत आणखी एक वर्षांचा करार केला आहे.
एका इंग्रजी वेबसाईटच्या वृत्तानुसार, सोनी वाहिनीने आपला करार रिन्यू केला असला तरी कपिल शर्मा इतर पर्यायावर ध्यान देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा ऑनलाइन स्ट्रिमिंग चॅनल नेटफ्लिक्सवर कॉमेडी करणार आहे. Netflix India सोबत कपिल शर्माचं बोलण सुरु आहे.
कपिल शर्मा डिजिटल प्लेटफॉर्मवर आपला शो आणण्यासाठी उत्साहित आहे. कपिलच्या मते भविष्यात सर्व मनोरंजन डिजिटलवर होणार आहे. कपिल नेटफ्लिक्ससह अमेझॉन आणि हॉटस्टारच्या टीमसोबतही संपर्कात आहे. फक्त एका पर्यायावर अवलंबून न राहता अनेक पर्याय उपलब्ध ठेवण कधीही चांगल असे कपिलला वाटत आहे. कपिल शर्माचा शो काही काळासाठी बंद होणार आहे. शो पुन्हा सुरु होईपर्यंत तो आपल्या आगामी चित्रपटाचे शुटींग संपवेल आणि आराम करेल.
द कपिल शर्मा शोमध्ये सध्या कपिलसोबत किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, भारती सिंग आणि चंदन प्रभाकर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात बॉलिवूडमधील एक तरी सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळतो.
कपिलने मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, प्रेक्षकांनी मला आजवर दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा आभारी आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच सतत काम करण्यासाठी आणि लोकांना हसवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे प्रत्येक आठवड्याला आम्हाला आमच्या फॅन्सच्या चेहऱ्यावर हसू फुलवता येते.