काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदलाची दफनभूमी बनवू - सय्यद सलाहउद्दीन
By admin | Published: September 4, 2016 08:54 AM2016-09-04T08:54:30+5:302016-09-04T09:00:52+5:30
हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीनने काश्मीर खो-याला भारतीय सैन्यदलाची दफनभूमी बनवू अशी धमकी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ४ - काश्मीरचा मोस्ट वाँटेड दहशतवादी आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीनने काश्मीर खो-यात भारतीय सैन्यदलाची दफनभूमी बनवू अशी धमकी दिली आहे. काश्मीरमध्ये अधिकाधिक आत्मघातकी हल्लेखोरांना प्रशिक्षित करु जे खो-याला भारतीय सैन्यदलाची दफनभूमी बनवतील अशी धमकी त्याने दिली आहे.
काश्मीरमध्ये जी अस्वस्थतता आहे त्याला खतपाणी घालणा-या सलाहउद्दीनने काश्मीर प्रश्नावर शांततामय मार्गाने राजकीय तोडगा काढण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. काश्मीर प्रश्नावर चर्चा निरर्थक असून, दहशतवादाशिवाय काश्मीर प्रश्नावर तोडगा शक्य नाही असे ६९ वर्षीय सलाहउद्दीनने म्हटले आहे.
लक्ष्य निश्चित करुन सशस्त्र उठावानेच काश्मीरप्रश्नी तोडगा निघू शकतो. शांततमय मार्गाने तोडगा निघणार नाही हे काश्मीरी नेतृत्व, जनता आणि मुजाहिद्दीन यांना ठाऊक आहे असे सलाहउद्दीनने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पाकिस्तान व्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथील कार्यालयात त्याने ही मुलाखत दिली.
काश्मीरमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. खो-यातील तणाव कमी करणे हा या भेटीमागचा उद्देश आहे. पण सलाहउद्दीने चिथावणीखोर, हिंसेची धमकी दिली आहे.