केरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 11:44 AM2017-08-17T11:44:28+5:302017-08-17T12:16:57+5:30

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहण करण्यापासून रोखणारे पलक्कडचे जिल्हाधिकारी पी. मेरीकुट्टी यांची बदली करण्यात आली आहे.  

In Kerala, the Collector of Sarsanghchalak has been transferred from the flag-bearer | केरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली 

केरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली 

Next

तिरुअनंतपुरम, दि. 17 - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहण करण्यापासून रोखणारे पलक्कडचे जिल्हाधिकारी पी. मेरीकुट्टी यांची बदली करण्यात आली आहे.  मात्र, या बदलीचा आणि मोहन भागवत यांना ध्वजरोहणापासून रोखल्याच्या घटनेचा काहीही संबंध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नियमानुसार ही बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

नेमके काय आहे प्रकरण ?
केरळमधील पलक्कड येथील एका सरकारी शाळेत सरसंघचालक मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहण करण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र परवानगी मिळाल्यानंतर भागवत यांनी ध्वजरोहण केले व स्वातंत्र्यदिनदेखील साजरा केला होता. स्वातंत्र्यदिनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रमुखाकडून ध्वजरोहण केले जाऊ नये, अशी नोटीस पलक्कडचे जिल्हाधिकारी पी.मेरीकुट्टी यांनी काढली होती.  पलक्कडमध्ये सरसंघचालकांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजरोहण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरच ही नोटीस काढण्यात आल्याची चर्चा होती.  

गेले काही महिने केरळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वातील सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. केरळमध्ये हे सरकार अस्तित्वात आल्यापासून गेल्या संघ कार्यकर्त्यांवरील हल्ले व हत्या प्रकरणातही वाढ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.  


आणखी बातम्या वाचा

(रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथ)
(परवानगी मिळाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं ध्वजारोहण)
(विद्यार्थ्यांदेखत शिक्षिकेला जाळलं जिवंत)
केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्याची हत्या
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती.  राजेश असे या कार्यकर्त्याचे नाव असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून घरी जाताना त्याच्यावर येथील श्रीकार्यम परिसरात हल्ला करण्यात आला होता. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने राजेशवर हल्ला केला.  रुग्णालयात त्याला नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्याच्यावर तब्बल 20 वेळा चाकूने वार केले होते.  दरम्यान, राजेशच्या हत्येमागे सीपीआय-एमचा हात असल्याचा आरोप केरळचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कुमानाम राजशेखरन यांनी केला होता.  

Web Title: In Kerala, the Collector of Sarsanghchalak has been transferred from the flag-bearer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा