पालिका घेतली, आता लक्ष्य लोकसभा विजयाचे; भाजपाच्या वाढत्या बळामुळे तिरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 09:17 AM2024-04-22T09:17:58+5:302024-04-22T09:18:43+5:30

केरळमध्ये भाजप गेली अनेक वर्षे काम करत आहे. आपली मते आणि मतांची टक्केवारी पक्षाने सातत्याने वाढवत नेली आहे.

Kerala Lok Sabha Elections - In Palakkad Constituency, BJP will have a three-way fight, Congress will win | पालिका घेतली, आता लक्ष्य लोकसभा विजयाचे; भाजपाच्या वाढत्या बळामुळे तिरंगी लढत

पालिका घेतली, आता लक्ष्य लोकसभा विजयाचे; भाजपाच्या वाढत्या बळामुळे तिरंगी लढत

मयुरेश वाटवे

पलक्कड : केरळमधील सर्वात उष्ण भाग म्हणून पलक्कड ओळखला जाताे. अतिउष्णतेसाठीच तो परिचित आहे. मात्र यंदा तापलेल्या राजकीय वातावरणानेही यात भर घातली आहे. काँग्रेसचे विद्यमान खासदार व्ही. के. श्रीकंदन यांना एलडीएफचे ए. विजयराघवन आणि भाजपचे सी. कृष्णकुमार टक्कर देत आहेत. 

या मतदारसंघातील भाजपच्या वाढत्या बळाने ही निवडणूक तिरंगी बनवली आहे. केरळमधील भाजपच्यचे जे ‘हॉटस्पॉट’  आहेत त्यात पलक्कडचा समावेश होतो. केरळमध्ये भाजप गेली अनेक वर्षे काम करत आहे. आपली मते आणि मतांची टक्केवारी पक्षाने सातत्याने वाढवत नेली आहे. पलक्कड पालिकेवर तर भाजपचीच सत्ता आहे. तिरंगी लढतीचा लाभ भाजपला होईल असा पक्षाचा अंदाज आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
केंद्राने गरीब व वंचितांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
जागावाटप ठरलेले नसल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीतील काॅंग्रेस आणि माकप एकमेकांविराेधात उभे.
या मतदारसंघात पाणीप्रश्न गेल्या काही वर्षांत ऐरणीवर आला आहे. 
पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव, हादेखील एक प्रमुख मुद्दा आहे.
 

Web Title: Kerala Lok Sabha Elections - In Palakkad Constituency, BJP will have a three-way fight, Congress will win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.