जवानांना मारलेल्या प्रत्येक थप्पडीसाठी 100 जिहादींना ठार करा - गौतम गंभीर

By admin | Published: April 13, 2017 03:53 PM2017-04-13T15:53:18+5:302017-04-13T16:27:40+5:30

भारतीय जवानांना मारल्या जाणा-या प्रत्येक थप्पडीच्या बदल्यात 100 जिहादींना ठार मारा अशा शब्दात भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपला संताप व्यक्त केला आहे.

Kill 100 Jihadis for every slap that killed the soldiers - Gautam Gambhir | जवानांना मारलेल्या प्रत्येक थप्पडीसाठी 100 जिहादींना ठार करा - गौतम गंभीर

जवानांना मारलेल्या प्रत्येक थप्पडीसाठी 100 जिहादींना ठार करा - गौतम गंभीर

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 13 - भारतीय जवानांना मारल्या जाणा-या प्रत्येक थप्पडीच्या बदल्यात 100 जिहादींना ठार मारा अशा शब्दात भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपला संताप व्यक्त केला आहे. काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना जमावाकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संतापलेल्या गौतम गंभीरने टि्वटकरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. 
 
भारतीय संघात सलामीवीराचा भूमिका बजावणारा गौतम गंभीर सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना छेडतानाचा तसंच मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जवानांना मिळणारी वागणूक पाहता भारतीयांचं रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही. 
 
ज्यांना आझादी हवी आहे त्यांनी आताच देश सोडून चालते व्हा. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे अशा गंभीरने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. मागच्या महिन्यातही गौतम गंभीरने भारतीय लष्कराची बाजू उचलून धरली होती. पण यावेळी त्याने दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी गुरमैहर कौरचाही बचाव केला होता. 
 
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानावेळी श्रीनगरमध्ये जोरदार हिंसाचार झाला होता. या व्हिडीओत हे जवान मतदान केंद्रावरुन परतत असल्याचं दिसत आहे. यावेळी हे जवान एव्हीएम घेऊन परतत असताना काही तरुण या जवानांवर हल्ला करत हाताने, पायाने मारहाण करत आहेत. तसंच यावेळी विरोधात घोषणाही दिल्या जात असल्याचं ऐकू येत आहे. एका तरुणाने तर जवानाचं हेल्मेटही फेकून दिलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. 
 
 


Web Title: Kill 100 Jihadis for every slap that killed the soldiers - Gautam Gambhir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.