पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी किरण बेदी
By admin | Published: May 22, 2016 06:27 PM2016-05-22T18:27:32+5:302016-05-22T20:41:56+5:30
माजी महिला आयपीएस अधिकारी आणि भाजप नेत्या किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी निवड झाली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22- माजी महिला आयपीएस अधिकारी आणि भाजप नेत्या किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी निवड झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी त्यांची नायब राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
अण्णा हजारेंच्या जनआंदोलनातून किरण बेदींचा चेहरा लोकांसमोर आला. अण्णांच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. कालांतरानं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपकडून त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषितही करण्यात आलं. त्यांनी देशातल्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होण्याचा मानही मिळवला आहे. आता त्या पुद्दुचेरी राज्याच्या नायब राज्यपालपदी नियुक्त झाल्या आहेत. पुद्दुचेरीचा निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला असून, या राज्यात काँग्रेसनं 30 पैकी 15 जागा जिंकून विजय मिळवला आहे. किरण बेदींच्या माध्यमातून पुद्दुचेरीवर वर्चस्व राखण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.