बँक खात्याशी आधार कार्ड जोडणं आवश्यक - आरबीआय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 07:44 PM2017-10-21T19:44:36+5:302017-10-21T20:02:37+5:30

बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याबाबत आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेच नव्हते, अशी माहिती आरटीआयद्वारे समोर आली आहे. आरबीआयने अर्जदाराला याबाबत माहिती दिली आहे.

linking aadhaar to bank accounts is mandatory rbi | बँक खात्याशी आधार कार्ड जोडणं आवश्यक - आरबीआय

बँक खात्याशी आधार कार्ड जोडणं आवश्यक - आरबीआय

Next

नवी दिल्ली - बँक खात्याशी आधार कार्ड जोडणं आवश्यक असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शनिवारी स्पष्ट केले आहे. 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग' कायद्यांतर्गत आधार कार्ड क्रमांक आपल्या बँक खात्याला जोडणं आवश्यक आहे,  असं भारतीय रिझर्व बँकेने सांगितले आहे. आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडणं आवश्यक नाही, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, आरबीआयनं मात्र याचा बातमीचे खंडण करत स्पष्टीकरण दिलं आहे.
 
'आपल्या बँक खात्याला आधार कार्ड नंबर जोडणं अनिवार्य नाही असं आरबीआयचं म्हणणं असल्याच्या बातम्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग, दुसरी सुधारणा 2917 अंतर्गत आधार क्रमांक जोडणे अनिवार्यच आहे. याबाबतची सूचना १ जून 2017 ला अधिकृत गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.',अशी माहिती आरबीआयनं ट्विटद्वारे दिली आहे. 


सरकारनं बँक खाती उघडण्यासाठी आणि 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कमेची देवाण-घेवाण करण्यासाठी जून 2017 पासून आधार कार्ड जोडणी सक्तीचं केले आहे.  सरकारने आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख 31  डिसेंबर असल्याचंही जाहीर केलं आहे

Web Title: linking aadhaar to bank accounts is mandatory rbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.