आलटून पालटूनच्या चक्रात काेणाला संधी?; थ्रिसूरमध्ये भाजपा चमत्कार करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 08:47 AM2024-04-21T08:47:14+5:302024-04-21T08:47:57+5:30
गेल्या वेळी गोपी यांनी १७ टक्के मते मिळवून इतिहास निर्माण केला होता. ही मते ३० टक्केपर्यंत गेल्यास ते या मतदारसंघात धक्का देऊ शकतात.
मयुरेश वाटवे
थ्रिसूर : थिरुअनंतपूरम ही केरळची राजधानी असली तरी सांस्कृतिक राजधानीचा मान जातो तो थ्रिसूरकडे. या मतदारसंघात आलटून पालटून काँग्रेस व सीपीआय उमेदवार जिंकत आलेला आहे. यंदा मात्र ‘ॲापरेशन थ्रिसूर’ भाजपने मनावर घेतलेले आहे. अभिनेता राजकारणी सुरेश गोपी यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवलेला आहे.
यंदा या मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षित असून सीपीआयचे व्ही. एस. सुनील कुमार, काँग्रेसचे के. मुरलीधरन आणि भाजपचे सुरेश गोपी शर्यतीत आहेत. गेल्या वेळी गोपी यांनी १७ टक्के मते मिळवून इतिहास निर्माण केला होता. ही मते ३० टक्केपर्यंत गेल्यास ते या मतदारसंघात धक्का देऊ शकतात. सहा लोकसभा निवडणुकांत थ्रिसूरने एकदाही विद्यमान खासदाराला निवडून दिलेले नाही. त्यामुळे यंदा हे चित्र बदलणार का, याकडे लक्ष आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
केंद्र सरकारच्या महिलांसाठी कल्याणकारी योजना.
महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण.
मोदी की गॅरंटी.
कुरुवन्नूर सर्व्हिस को ॲापरेटिव्ह बँक घोटाळा.
विरोधकांकडून सीएएचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
सेक्युलॅरिझम विरुद्ध डेव्हलपमेंट असे चित्रही उभे केले जात आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
टी. एन. प्रथापन
काँग्रेस (विजयी)
४,१५,०८९
राजाजी मॅथ्यू थॉमस
सीपीआय
३,२१,४५६