देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 04:44 AM2018-07-21T04:44:32+5:302018-07-21T04:44:44+5:30

देशात सर्वाधिक शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

In Maharashtra, most farmers suicides in Maharashtra | देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात

Next

- संतोष ठाकूर 
नवी दिल्ली : देशात सर्वाधिक शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. देशात २०१६साली शेतकरी व शेतमजूर मिळून ११,३७० जणांनी आत्महत्या केली. त्यातील ३६६१ महाराष्ट्रातील होते. ही धक्कादायक आकडेवारी सरकारने संसदेत दिली. राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण ब्युरोने (एनसीआरबी) २०१६ साठी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी संबंधित हंगामी माहिती दिली. तीत म्हटले आहे की, महाराष्ट्रानंतर कर्नाटक राज्य आहे. तेथे २०७९ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केली. तिसºया क्रमांकावर मध्य प्रदेश आहे. तेथे २०१६ मध्ये शेतकरी व शेतमजूर मिळून १३२१ आत्महत्या झाल्या आहेत.
वेगवेगळ््या राज्यांतील शेतकºयांच्या आत्महत्या जास्तही असू शकतात. कारण ही तात्पुरती आकडेवारी आहे. सविस्तर अहवाल बनवण्यासाठी आणखी बारकाईने अभ्यास केल्यास आकड्यात बदल होऊ शकतो. शेतकरी आत्महत्येचा विषय संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत अनेक सदस्यांनी उपस्थित केला. त्यात तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांच्यासह इतर खासदारांचा समावेश होता.
एनसीआरबीने दिलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शेतीच्या कामात सक्रिय असलेले ११११ मजूर आणि २५५० शेतकºयांनी आत्महत्या केली.
गोव्यात फक्त एका शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. देशात आठ राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत याच कालावधीत एकही अशी आत्महत्या झाल्याचे समोर आलेले नाही. ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत बिहार, लक्षद्वीप, दमण-दीव, दादरा- नगर हवेली, चंदीगढ, दिल्ली, पश्चिम बंगाल, नागालँडचा समावेश आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालय आणि नीती आयोग एकत्र येऊन शेती लाभदायक व्हावी यासाठी काम करत आहे. सरकारने नुकताच शेतमालाला हमीभाव दुपट्ट केला. या परिस्थितीत येत्या काळात काही चांगले बदल घडतील अशी आशा आहे.
>शेतमजुरांचेही प्रमाण मोठे
एनसीआरबीने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये देशात एकूण १२,३६० आणि २०१५ मध्ये १२,६०२ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केली होती. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर २०१४ मध्ये एकूण ४,००४ शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केली. त्यात १,४३६ शेतमजूर तर २,५६८ शेतकरी होते. २०१५ मध्ये एकूण ४,२९१ शेतकरी-शेतमजुरांनी आत्महत्या केली होती. यात शेतकरी ३,०३० तर १,२६१ शेतमजूर होते.

Web Title: In Maharashtra, most farmers suicides in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.