दुबईतील बुर्ज खलिफासह भारतातील अनेक इमारतींना तिरंग्याची रोषणाई

By Admin | Published: January 25, 2017 10:25 PM2017-01-25T22:25:56+5:302017-01-25T23:17:03+5:30

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगातील सर्वात उंच असलेली दुबईतील बुर्ज खलिफा ही इमारत भारतीय तिरंग्याच्या रोषणाईनं उजळून निघाली आहे.

Many Burj Khalifa in Dubai illuminated the many buildings in India | दुबईतील बुर्ज खलिफासह भारतातील अनेक इमारतींना तिरंग्याची रोषणाई

दुबईतील बुर्ज खलिफासह भारतातील अनेक इमारतींना तिरंग्याची रोषणाई

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगातील सर्वात उंच असलेली दुबईतील बुर्ज खलिफा ही इमारत भारतीय तिरंग्याच्या रोषणाईनं उजळून निघाली आहे. 
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीसह भारतातील मुंबईचे सीएसटी स्टेशन, मुंबई महापालिका, मंत्रालय आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत सुद्धा तिरंग्याचा रंगात दिसत आहे. याचबरोबर दिल्लीतील राष्ट्रपती भवन, ओडिशातील पोलिस मुख्यालय, मध्यप्रदेशातील विधानसभेची इमारत यांसह भारतातील अनेक सरकारी आणि खासगी इमारतींवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 
दरम्यान, बुर्ज खलिफाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या इमारतीचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. 
 

Web Title: Many Burj Khalifa in Dubai illuminated the many buildings in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.