बेरोजगारीमुळे मोदी, ट्रम्प यांचा विजय, राहुल यांचा हल्ला; काँग्रेसलाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:10 AM2017-09-21T04:10:52+5:302017-09-21T04:10:54+5:30

बेरोजगारीमुळे आलेल्या नैराश्यामुळेच नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांना लोक निवडून देत आहेत, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी व्यक्त केले.

Modi, Trump beat, Rahul's assault due to unemployment; Congress also hit | बेरोजगारीमुळे मोदी, ट्रम्प यांचा विजय, राहुल यांचा हल्ला; काँग्रेसलाही फटका

बेरोजगारीमुळे मोदी, ट्रम्प यांचा विजय, राहुल यांचा हल्ला; काँग्रेसलाही फटका

Next

प्रिन्स्टन (अमेरिका) : बेरोजगारीमुळे आलेल्या नैराश्यामुळेच नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांना लोक निवडून देत आहेत, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी व्यक्त केले. पुरेसा रोजगार निर्माण करू न शकल्यामुळे काँग्रेसला २०१४च्या निवडणुकीत अपयश आल्याचेही त्यांनी मान्य केले.
गांधी दोन आठवड्यांच्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. प्रिन्स्टन विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर राहुल गांधी म्हणाले की, रोजगार हा सक्षम करण्याचे, देशबांधणीच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करण्याचे साधन आहे. मला असे वाटते की मोदींचा उदय झाला आणि ट्रम्प सत्तेत आले, याचे मुख्य कारण हे भारतात आणि अमेरिकेतील बेरोजगारीत आहे.
आमच्या देशात कोट्यवधींना रोजगार नाही व त्यांना भवितव्यही दिसत नाही. त्यामुळे त्यांना वेदना होतात आणि त्यांनी अशा प्रकारच्या नेत्यांना पाठिंबा दिला, असे सांगून गांधी म्हणाले की, बेरोजगारी आहे हा प्रश्नच कोणी मान्य करायला तयार नाही हीच एक समस्या आहे.
ट्रम्प यांच्याबद्दल मला माहिती नाही. मी त्यांच्याविषयी फारसे बोलणार नाही. परंतु, आमचे पंतप्रधान पुरेशी रोजगार निर्मिती करीत नाहीत. गांधी यांनी तज्ज्ञ, व्यावसायिक नेते आणि अमेरिकेचे काँग्रेस नेते यांच्याशी झालेल्या भेटीत वारंवार बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. सध्या आम्ही पुरेसा रोजगार तयार करीत नाही. रोज ३० हजार नवे युवक रोजगाराच्या बाजारात दाखल होत आहेत; तरीही सरकार दररोज फक्त ५०० रोजगार तयार करीत आहे. यात आधीच प्रचंड प्रमाणावर असलेल्या बेरोजगारांचा समावेश नाही, असे गांधी याआधीच्या बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील भाषणात म्हणाले होते. (वृत्तसंस्था)
>आमच्यावर रागावले
प्रिन्स्टनमधील भाषणात गांधी म्हणाले होते की, भारताला चीनशी स्पर्धा करण्यासाठी स्वत:त बदल करून घ्यावे लागतील. त्याचसाठी देशातील लोकांना रोजगारांची गरज आहे.
आम्ही दररोज ३० हजार रोजगार निर्माण करू शकलो नाही, म्हणून रागावलेले लोक आता मोदींवरही रागावलेले आहेत. तो प्रश्न सोडवणे हा मध्यवर्ती भाग आहे. माझा मुख्य मुद्दा आहे तो हा की मोदी यांनी रोजगाराच्या प्रश्नालाच दुसरीकडे वळवले व बोट दुसरीकडेच दाखवत आहेत,
असे गांधी म्हणाले.

Web Title: Modi, Trump beat, Rahul's assault due to unemployment; Congress also hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.