विचारवंतांचा खून होणे निषेधार्हच : सदानंद मोरे
By Admin | Published: August 31, 2015 09:30 PM2015-08-31T21:30:30+5:302015-08-31T21:30:30+5:30
पुणे : तालिबानीकरणाचा प्रश्न फक्त महाराष्ट्रातच आहे, असा समज होता. पण कलबुर्गी यांच्या हत्येमुळे हे लोण महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून बाहेर गेल्याचे दिसते आहे. लोकशाहीत विचारवंतांचा खून होणे अयोग्यच आहे. अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
प णे : तालिबानीकरणाचा प्रश्न फक्त महाराष्ट्रातच आहे, असा समज होता. पण कलबुर्गी यांच्या हत्येमुळे हे लोण महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून बाहेर गेल्याचे दिसते आहे. लोकशाहीत विचारवंतांचा खून होणे अयोग्यच आहे. अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.मूर्तिपूजेविरुद्ध जनजागृती अभियान सुरू केलेले कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि विद्रोही साहित्यिक डॉ. मल्लेशाप्पा एम. कलबुर्गी यांची रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. यासंदर्भात बोलताना डॉ. मोरे म्हणाले, 'दाभोलकर, पानसरे आणि आता कलबुर्गी यांची हत्या झाली. वाईट अर्थाने हॅट्ट्रिक झाली आहे. कलबुर्गी यांनी सुरक्षा नाकारली म्हणून हत्या झाली, असे म्हटले जात आहे. पण संरक्षण तरी किती लोकांना पुरविणार? असे प्रकार केवळ संरक्षण देऊन थांबणारे नाहीत. अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे. अशा घटना घडू नयेत, म्हणून योग्य ती यंत्रणा उभारली गेली पाहिजे.