ट्रिपल तलाक संपवण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे यावं, मोदींचं आवाहन
By admin | Published: April 29, 2017 01:02 PM2017-04-29T13:02:08+5:302017-04-29T13:30:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रिपल तलाकच्या मुद्याचं राजकारण न करण्याचा आग्रह करत मुस्लिम समाजाला पुढे येऊन तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रिपल तलाकच्या मुद्याचं राजकारण न करण्याचा आग्रह करत मुस्लिम समाजाला पुढे येऊन तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी बाराव्या शतकातील क्रांतीकारी समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं. मोदी बोलले की, "समाजातील लोकच जुन्या परंपरा तोडून आधुनिक गोष्टींचा स्विकार करतात. मला आशा आहे की मुस्लिम समाजातील लोक पुढे येतील आणि ट्रिपल तलाकशी संघर्ष करत असलेल्या मुस्लिम महिलांना मदत करत मार्ग काढतील".
नरेंद्र मोदी यांनी यावेळी हिंदू धर्मातील सतीप्रथेला संपवणा-या समाजसुधारक राजा राममोहन राय यांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, "राजा राममोहन राय यांनी जेव्हा सतीप्रथेवर बंदी आणण्यासंबंधी आपले विचार मांडले असतील तेव्हा त्यांच्यावर किती टिका झाली असेल. पण तरीही त्यांनी आपल्याच समाजातील प्रथेविरोधात लढा दिला आणि करुन दाखवलं.
Muslim samaj se prabudh log aage ayenge, Muslim betiyon ke sath jo guzar rahi hai uske khilaf ladai ladenge;rasta nikalenge: PM #TripleTalaqpic.twitter.com/pmAiQKx57W
— ANI (@ANI_news) April 29, 2017
मोदींनी मुस्लिम समाजाला ट्रिपल तलाकवर तोडगा काढण्याचं आवाहन करताना सांगितलं की, "ट्रिपल तलाकवरुन सध्या देशात एवढी चर्चा सुरु आहे. आपली महान पंरपरा पाहता मलाही आशा वाटू लागली आहे. आपल्या देशात समाजामधीलच लोक समोर येतात ते अयोग्य, चुकीच्या प्रथांना विरोध करत त्यांचा विमोड करुन आधुनिक परंपरांचा स्विकार करतात".
फार पुर्वीच महिलांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ट्रिपल तलाकच्या मुद्याचं राजकारण होता कामा नये. भारतातूनच शिक्षित मुसलमान पुढे येतील आणि या मुद्यावर तोडगा काढतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. मोदींनी सांगितलं की, "समस्येवरील उपाय शोधून काढणं गरजेचं आहे. ट्रिपल तलाकला सामोरं जावं लागत असलेल्या महिलांची सुटका केली गेली पाहिजे. देशातील शिक्षित मुस्लिमांनी यासाठी पाऊलं उचलावीत. याचा फायदा येणा-या पिढ्यांना होईल".