एनआयएमुळे दगडफेक कमी झाली, गृहमंत्र्यांचा दावा; दहशतवाद्यांना पैसे पुरविणाऱ्यांना भरते कापरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 02:37 AM2017-08-21T02:37:19+5:302017-08-21T02:37:53+5:30
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बजाविलेल्या कामगिरीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत घट झाली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले.
लखनौ : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बजाविलेल्या कामगिरीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत घट झाली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले.
एनआयएचे कार्यालय आणि निवासी संकुलाच्या उद््घाटनानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत नक्षलवादी व दहशतवादी कारवायांमध्येही घट झाल्याचे दिसत आहे.
गेल्या तीन वर्षांत ईशान्य भारतात अतिरेकी कारवायांमध्ये ७५ टक्के तर नक्षलवादी कारवायांत ३५-४० टक्के घट झाल्याचे सिंह म्हणाले. दहशतवादी कारवायांना मिळणाºया पैशांचा स्रोत संपविण्यावर भर देऊन राजनाथ सिंह म्हणाले की, ‘आम्ही दहशतवादी कारवायांना मिळणारा पैसा आणि बनावट चलनाला आळा घातला व त्याचा मोठा फटका दहशतवादी कारवायांना बसला.’
या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दर सहा महिन्यांनी एनआयए आणि राज्याच्या तपास यंत्रणा यांच्यात बैठक घेण्याचे सुचविले. चांगल्या समन्वयाशिवाय यश मिळू शकत नाही. देशात एनआयएचे निवासी संकुल प्रथमच उभे राहिले आहे. (वृत्तसंस्था)
कामाचे कौतुक
येथे एनआयए चांगले काम करीत आहे. दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविणाऱ्यांना एनआयएच्या नावानेही कापरे भरते, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.