२०१६ च्या आधी सर्जिकल स्ट्राइक झाले नाही : लष्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 02:15 AM2017-08-28T02:15:45+5:302017-08-28T02:17:08+5:30
सर्जिकल स्ट्राईक २९ सप्टेंबर, २०१६च्या पूर्वी झाल्याची नोंद नाही, असे लष्कराने म्हटले. लष्कराच्या मिलिटरी आॅपरेन्शनच्या महासंचालकांनी प्रेस ट्रस्ट आॅफ इंडियाने
नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक २९ सप्टेंबर, २०१६च्या पूर्वी झाल्याची नोंद नाही, असे लष्कराने म्हटले. लष्कराच्या मिलिटरी आॅपरेन्शनच्या महासंचालकांनी प्रेस ट्रस्ट आॅफ इंडियाने माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाला उत्तर देताना ही माहिती दिली.
सर्जिकल स्ट्राईक २९ सप्टेंबर, २०१६ रोजी करण्यात आले. यापूर्वी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याची कोणतीही माहिती या विभागाकडे नाही, असे डीजीएमओंनी पत्रकार परिषदेत निवेदनात म्हटले. ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ म्हणजे काय याची भारतीय लष्करात काय व्याख्या आहे याची माहितीच्या अधिकारात संरक्षण मंत्रालयाकडे विचारणा करण्यात आली होती.
डीजीएमओंनी म्हटले आहे की खुल्या स्त्रोतात जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार सर्जिकल स्ट्राईकची व्याख्या अशी : निश्चित अशा गोपनीय माहितीच्या आधारे लष्कराच्या वैध ठिकाणांवर जास्तीतजास्त परिणाम घडवणे आणि उभय बाजुंची किमान हानी होऊ देणे अशी केलेली कारवाई. त्यात लक्ष्य ठरवेल्या भागात हेतुत: शिरणे, नेमकी अमलबजावणी आणि सैनिकांच्या तुकड्या वेगाने मूळ तळावर आणणे.’’ २००४ ते २०१४ या कालावधीत लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केले होते का असेही या अर्जात विचारण्यात आले होते.