आता ब्राह्मोस गाठणार ४५० किमीचा टप्पा, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात आल्याचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 03:55 AM2017-11-24T03:55:02+5:302017-11-24T03:57:25+5:30

मुंबई : सुखोईवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र आता साडेचारशे किमीपर्यंत मारा करू शकणार आहे.

Now the 450 km track will reach Brahmos, the advantage of the missile technology control group | आता ब्राह्मोस गाठणार ४५० किमीचा टप्पा, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात आल्याचा फायदा

आता ब्राह्मोस गाठणार ४५० किमीचा टप्पा, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात आल्याचा फायदा

googlenewsNext

चिन्मय काळे
मुंबई : सुखोईवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र आता साडेचारशे किमीपर्यंत मारा करू शकणार
आहे. ‘ब्राह्मोस मार्क टू’ या क्षेपणास्त्राचे उत्पादन पुढील वर्षी सुरू होत आहे. भारत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात आल्याने हे शक्य
होत आहे.
आवाजापेक्षा जलदगतीने मारा करणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र बुधवारी सुखोई लढाऊ विमानातून यशस्वीपणे डागण्यात आले. या यशानंतर आता पुढील स्तराच्या उत्पादनाची तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये हवाईदलाला मार्चपासून तर नौदलाला त्यानंतर पुढील श्रेणीतील ब्राह्मोसचा पुरवठा केला जाईल, असे ब्राह्मोस लिमिटेडच्या महाराष्टÑातील कारखान्याचे महाव्यवस्थापक मेजर जनरल (निवृत्त) अच्युत देव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
नव्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राला मागून वेग देणारा पंखा लावला जाणार नाही. याचे कारण सुखोई विमानाचा वेग तसाही २२०० किमी प्रति तास आहे. एवढ्या वेगाने उडणाºया विमानाने मारा करण्यासाठी पंख्याची गरज नाही. पंखा काढल्यानेच या क्षेपणास्त्राचे वजन ८०० किलोने कमी होणार आहे.
>काय आहे ‘क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गट’
क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गट (एमटीसीआर) जगातील35 देशांचा समूह. संयुक्त राष्टÑांच्या नियमानुसार, सुपरसोनिक वेगाने कुठल्याही क्षेपणास्त्राची मारक क्षमता300 किमीपेक्षा अधिक ठेवण्यास मज्जाव आहे. भारताला तीन महिन्यांपूर्वीच या गटाचे सदस्यत्व मिळाले. परंतु, सुखोईवरील यशस्वी चाचणीची प्रतीक्षा होती. ती होताच आता ४५० किमीच्या ब्राह्मोससाठी हालचाली जलद सुरू झाल्याची माहिती विशेष सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.अनेक देश यांत अधिक मारक क्षमतेची क्षेपणास्त्रे तयार करीत आहेत. अशा सर्वांनी एकत्र येत हा गट स्थापन केला. त्याचे सदस्यत्व मिळणारे राष्टÑ लांब पल्ल्याच्या सुपरसोनिक क्षेपणास्त्राची निर्मिती करू शकतात.
पुढील ब्राह्मोस हे ४५० किमीपर्यंत मारा करणारे असेल.
सुखोई विमानाने हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी त्याचे वजन ०.८ टनापर्यंत (८०० किलो) कमी केले जाणार आहे.

Web Title: Now the 450 km track will reach Brahmos, the advantage of the missile technology control group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.