भारतावर 2002 मध्ये अणुहल्ला करणार होते मुशर्रफ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 06:39 PM2017-07-27T18:39:52+5:302017-07-27T19:27:56+5:30

पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. 2002 साली भारतावर अणुहल्ला करण्याचा विचार होता असं मुशर्रफ म्हणाले आहेत. 

Pervez Musharraf considered using nukes against india | भारतावर 2002 मध्ये अणुहल्ला करणार होते मुशर्रफ

भारतावर 2002 मध्ये अणुहल्ला करणार होते मुशर्रफ

Next
ठळक मुद्देभारतावर अणुहल्ला करण्याचा विचार होता, मात्र प्रत्युत्तरात भारताकडून होणा-या हल्ल्याचा विचार करून हा अणुहल्ल्याचा विचार डोक्यातून काढून टाकलातणावाच्या त्या दिवसांमध्ये मुशर्रफ यांनी अनेक रात्रं केवळ हाच विचार करत जागवल्या होत्या.

नवी दिल्ली, दि. 27 - पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. 2002 साली भारतावर अणुहल्ला करण्याचा विचार होता असं मुशर्रफ म्हणाले आहेत. 

2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर चांगलाच तणाव निर्माण झाला होता. त्याच्यानंतर भारतावर अणुहल्ला करण्याचा विचार होता, मात्र प्रत्युत्तरात भारताकडून होणा-या हल्ल्याचा विचार करून हा अणुहल्ल्याचा विचार डोक्यातून काढून टाकला असं मुशर्रफ म्हणाले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तणावाच्या त्या दिवसांमध्ये मुशर्रफ यांनी अनेक रात्रं केवळ हाच विचार करत जागवल्या होत्या. या दरम्यान भारतावर अणुहल्ला करावा की नाही हाच विचार ते करत होते. जापानचं वृत्तपत्र 'मेनची शिमबुने’सोबत बोलताना मुशर्रफ यांनी याबाबत खुलासा केला आहे.  2002 मध्ये भारत-पाकिस्तान दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. एक वेळ अशी होती की अणुहल्ल्याचा वापर करण्याबाबत बनवण्यात आलेल्या नीतिचं उल्लंघन करण्याचा विचार होता असं मुशर्रफ म्हणाले.  

विशेष म्हणजे 2002 मध्ये परवेज मुशर्रफ यांनी सार्वजनिक स्थरावर याबाबत विधानही केलं होतं. अणुहल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मुशर्रफ त्यावेळी म्हणाले होते. 

कसाबपेक्षा कुलभूषण जाधव मोठे दहशतवादी - परवेझ मुशर्रफ

कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिलेला आदेश मान्य करणे पाकिस्तानात अनेकांना जड जात आहे.याला पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफही अपवाद नाहीत. भारतीय नागरीक कुलभूषण जाधव हे अजमल कसाबपेक्षा मोठे दहशतवादी आहेत असे वक्तव्य मुशर्रफ यांनी केले आहे. मुशर्रफ सध्या पाकिस्तानात देशद्रोहाच्या आरोपाचा सामना करत आहेत. 

कसाब फक्त एक प्यादा होता. पण जाधव दहशतवादाला खतपाणी घालत होते. त्यांनी घातपात घडवून पाकिस्तानात अनेकांना ठार मारले असते असा आरोप मुशर्रफ यांनी एआरवाय न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर ठरवून सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय कोर्टाने स्थगिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारे उघडे पडल्यामुळे पाकिस्तानात अऩेकांचे पित्त खवळले असून असे उलट-सुलट आरोप केले जात आहेत. 

नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवून पाकिस्तानची सूत्रे आपल्या हाती घेणा-या शरीफ यांच्या मते पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टात जायलाच नको होते हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. दुस-या कोणाला आपल्या सुरक्षेसंबंधी ठरवण्याचा अधिकार नाही असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहा पाक पुरस्कृत  दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहा दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब हा जिवंत हाती लागलेला एकमेव दहशतवादी होता. कसाबमुळे भारताच्या हाती मोठा पुरावा लागला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा उघडा पडला. आता त्याच कसाबपेक्षा जाधव अधिक धोकादायक होते असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. 

Web Title: Pervez Musharraf considered using nukes against india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.