पोस्टर्सवर पायलट अभिनंदन यांचा फोटो, नेटीझन्सकडून भाजपची धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 06:20 PM2019-03-04T18:20:17+5:302019-03-04T18:22:50+5:30
पॉंडेचरी भाजपने टिविट् केले यात जर देशात काँग्रेस सरकार असते तर अभिनंदन परतला नसता मात्र हे मोदी सरकार आहे त्यामुळे 56 तासांत अभिनंदन यांची सुटका पाकिस्तानला करावी लागली अशा मजकूर टिवि्ट केला. या मजकुरावर नेटीझन्सकडून भाजपला धारेवर धरण्यात आले.
नवी दिल्ली - भारतीय वायुसेनेचे पायलट अभिनंदन वर्धमान यांना भारतात आणल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी पोस्टर्स लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या विमानांचा पाठलाग करत अभिनंदन पाकिस्तानात गेला. मात्र विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने अभिनंदन यांना पाकिस्तान सैन्याने जेरबंद केले. मात्र लगेच पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांची सुटका करणार असल्याचं जाहीर केले. 1 मार्च रोजी वाघा बोर्डरमार्गे पायलट अभिनंदन वर्धमान भारतात सुखरूप परतले, संपुर्ण देशभरात अभिनंदन यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन यांचे पोस्टर्स लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले.
पॉंडेचरी भाजपने टिविट् केले यात जर देशात काँग्रेस सरकार असते तर अभिनंदन परतला नसता मात्र हे मोदी सरकार आहे त्यामुळे 56 तासांत अभिनंदन यांची सुटका पाकिस्तानला करावी लागली अशा मजकूर टिवि्ट केला. या मजकुरावर नेटीझन्सकडून भाजपला धारेवर धरण्यात आले.
सचिन कृष्ण या युजरने ही पोस्ट शेअर करत विंग कमांडर अभिनंदन यांचा फोटो भाजपच्या पोस्टर्सवर लावण्यात आला हा सेनेचा अपमान नाही का असा प्रश्न उपस्थित केला.
तर दुसऱ्या युजरने एअर स्ट्राईकचा वापर भाजपाने राजकीय फायद्यासाठी केला हे यावरून स्पष्ट होत आहे असा आरोप केला.
तर आकांक्षा ओला नावाच्या युजरने भाजपला थोडीही लाज उरली नसून आपल्या स्वार्थासाठी ते विंग कमांडर अभिनंदन यांच्या फोटोचा वापर करत असल्याची टीका केली.
कमल कुमार या युजरने प्रिय भाजपा, मतांसाठी अभिनंदन यांचा वापर करू नका स्वत;ची राजकीय शक्तीचा वापर करा असा सल्ला दिला.