विमान उड्डाणवस्थेत असताना मोबाइलला लागली आग, जेट एअरवेजच्या विमानातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 02:04 PM2017-10-21T14:04:10+5:302017-10-21T14:08:05+5:30

दिल्लीहून-इंदूरला जाणा-या जेट एअरवेजच्या विमानातील एका प्रवाशाच्या मोबाइलला शुक्रवारी अचानक आग लागली.

The plane was flying in the air when the aircraft was flying, Jet Airways plane incident | विमान उड्डाणवस्थेत असताना मोबाइलला लागली आग, जेट एअरवेजच्या विमानातील घटना

विमान उड्डाणवस्थेत असताना मोबाइलला लागली आग, जेट एअरवेजच्या विमानातील घटना

Next
ठळक मुद्दे विमनाने उड्डाण केल्यानंतर 15 मिनिटांनी हँडबॅगमधून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. क्रू ने अग्निरोधक यंत्र वापरण्याचा प्रयत्न केला पण विमानातील आग विझवणारी यंत्रणा काम करत नव्हती

नवी दिल्ली - दिल्लीहून-इंदूरला जाणा-या जेट एअरवेजच्या विमानातील एका प्रवाशाच्या मोबाइलला शुक्रवारी अचानक आग लागली. त्यामुळे विमानात एकच गोंधळ निर्माण झाला होता. सुदैवाने यावेळी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. विमानातील क्रू ने लगेच हा मोबाइल पाण्यात टाकून आग विझवली. ही दुर्घटना  घडली त्यावेळी विमानात एकूण 120 प्रवासी होते. 

दिल्लीतील रहिवाशी अर्पिता ढाल यांचा हा मोबाइल होता. आसनाखाली हँडबॅगमध्ये त्यांनी हा मोबाइल ठेवला होता. विमनाने उड्डाण केल्यानंतर 15 मिनिटांनी हँडबॅगमधून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मदतीसाठी तात्काळ विमानातील क्रू ला बोलावले. विमान उड्डाणवस्थेत असताना आग लागल्याचे समजल्यामुळे उपस्थित प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. प्रवासी घाबरले होते. आम्ही देवाचा धावा केला असे अर्पिताचे पती अतुल यांनी सांगितले. 

क्रू ने अग्निरोधक यंत्र वापरण्याचा प्रयत्न केला पण विमानातील आग विझवणारी यंत्रणा काम करत नव्हती असे त्यांनी सांगितले. अर्पिता यांच्या हँडबॅगमध्ये एकूण तीन मोबाइल होते त्यातील एकाने पेट घेतला. मी घरी परतल्यानंतर जेट एअरवेजकडे तक्रार नोंदवणार आहे. हा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. विमानात उद्या अचानक मोठी आग लागली किंवा स्फोट झाला अशावेळी विमानातील अग्निरोधक यंत्रणा काम करत नसेल तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय ? असा सवाल अतुल यांनी केला. 

जेट एअरवेजच्या प्रवक्त्याने ही घटना घडल्याचे मान्य केले. आखून दिलेल्या मार्गदर्शकतत्वानुसार क्रू ने त्यावेळी काम केले असे प्रवक्त्याने सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आवश्यक पावले उचलली असे त्यांनी सांगितले. विमानाच्या क्रू ने पाण्याच्या ट्रे मध्ये आग लागलेल्या मोबाइलसह त्यांचे दोन फोन ठेवले असे अतुल यांनी सांगितले. आग लागलेला फोन जेट एअरवेजच्या ताब्यात असून तपास पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा परत करण्यात येईल असे दिल्लीतील जेट एअरवेजच्या प्रवक्त्याने सांगितले. 

Web Title: The plane was flying in the air when the aircraft was flying, Jet Airways plane incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.