बैलाच्या पोटात प्लॅस्टिक बॅग अन् एलईडी बल्ब

By admin | Published: April 21, 2017 02:10 AM2017-04-21T02:10:11+5:302017-04-21T02:10:11+5:30

प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आणली असली तरी यातून पळवाटा काढत अनेक ठिकाणी सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे

Plastic bag and LED bulb in the belly stomach | बैलाच्या पोटात प्लॅस्टिक बॅग अन् एलईडी बल्ब

बैलाच्या पोटात प्लॅस्टिक बॅग अन् एलईडी बल्ब

Next

तंजावूर : प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आणली असली तरी यातून पळवाटा काढत अनेक ठिकाणी सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. जनावरांच्या पोटात हे प्लॅस्टिक जात असून त्यांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. आता हेच पाहा ना तामिळनाडूतील तंजावूर या गावात पशु चिकित्सकांनी बैलाच्या पोटातून ३८ किलो प्लॅस्टिक बॅग आणि एलईडी बल्ब काढला आहे. जल्लीकटूत हा बैल सहभागी असतो. या बैलाच्या पोटात प्लॅस्टिक बॅग असल्याचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया करुन ३८ किलो प्लॅस्टिक बॅग आणि एलईडी बल्ब काढण्यात आला. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर आजही सर्रास केला जात असून मोकळ्या मैदानावर आणि कचराकुंड्यात या प्लॅस्टिक पिशव्या टाकल्या जातात.
जनावरे इतर खाद्यासोबत या पिशव्याही नकळत खाऊन टाकतात. परिणामी, आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.

Web Title: Plastic bag and LED bulb in the belly stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.