मन की बात : ''एक मुलगी दहा मुलांच्या बरोबरीची, महिला देशाचा गौरव वाढवत आहेत''
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 01:49 PM2018-01-28T13:49:12+5:302018-01-28T13:50:26+5:30
मुंबईतील माटुंगा रेल्वे स्टेशनाच मोदींनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केला. देशातील माटुंगा स्टेशन हे एकमेव स्टेशन आहे, जिथे महिला सर्व काम सांभाळत आहेत, असं सांगत माटुंगा स्टेशनच्या कर्मचारी महिलांचा मोदींनी गौरव केला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवारी) मन की बात कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी 'स्त्री शक्ती'चा गौरव केला आणि 'एक मुलगी दहा मुलांच्या बरोबरीची असते असं ते म्हणाले. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच 'मन की बात' होती.
ते म्हणाले, प्राचीन काळापासून सध्याच्या स्थितीपर्यंत अनेक महिलांनी देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. भारतात आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत आणि देशाचा गौरव वाढवत आहेत. नारी शक्ती नेहमीच देश, समाज आणि कुटुंब एकतेच्या सुत्रात बांधले आहे. देशात प्रचीन काळापासून महिलांना सन्मान दिला जात आहे.
अंतराळवीर कल्पना चावलाचा उल्लेख यावेळी मोदींनी केला. मोदींनी प्रकाश त्रिपाठी यांचे आभार मानले कारण, त्यांनी महिला शक्तीचे उदाहरण देताना लिहिलेल्या पत्रात भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, 1 फेब्रुवारीला कल्पना चावलाची पुण्यतिथी आहे. अंतराळातील दुर्घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती आपल्यातून लवकर गेल्याचं दुःख आहे. कल्पना चावला भलेही आज आपल्यात नसेल. पण तिने देशाची मान उंचावली आहे. आज कल्पना अनेक मुलींची प्रेरणा बनललेली आहे, असं ते म्हणाले.
मुंबईतील माटुंगा रेल्वे स्टेशनाच मोदींनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केला. देशातील माटुंगा स्टेशन हे एकमेव स्टेशन आहे, जिथे महिला सर्व काम सांभाळत आहेत, असं सांगत माटुंगा स्टेशनच्या कर्मचारी महिलांचा मोदींनी गौरव केला.
मोदी म्हणाले, भारतीय विदुषिंची परंपरा फार पुरातन राहिली आहे. वेदांच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोठे होते. लोपमुद्रा आणि गार्गीचा आपण त्यासाठी नेहमीच उल्लेख करतो. आपण 'बेटी बचाओ' बद्दल बोलत असतो मात्र, वेदांमध्ये म्हटले आहे की एक मुलगी 10 मुलांच्या बरोबरीची असते.