ममतादीदी दरवर्षी मला एक-दोन कुर्ते पाठवतात- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 10:26 AM2019-04-24T10:26:41+5:302019-04-24T10:42:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली होती.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली. विशेष म्हणजे मोदींची ही मुलाखत अभिनेता अक्षय कुमारनं घेतली. या मुलाखतीतून मोदींनी आयुष्यातले अनेक पैलू उलगडले आहेत. यावेळी मोदींनी स्वतःच्या आवडी-निवडीबद्दल अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दरवर्षी मला एक-दोन कुर्ते पाठवतात, याचीही आठवण मोदींनी करून दिली आहे.
मी फार लहान वयात घर सोडलं. कारण तेव्हाचं जीवन वेगळंच होतं. केव्हा केव्हा कुटुंबीयांबरोबर वेळ घालवण्याची इच्छा व्हायची, तेव्हा आईला बोलावून घ्यायचो, परंतु नंतर आईच बोलायची की मी इथे काय करणार, मी परत जाते. मोदी म्हणाले, माझ्याकडे जेव्हा आई येते, तेव्हा तिला वेळ देता येत नाही. एखाद दुसऱ्या वेळी फक्त तिच्याबरोबर जेवण होते. जर एखादी घटना मला न आवडल्यास मी ती कागदावर लिहितो. ती घटना का झाली, त्यानंतर तो कागद फेकून देत होतो. परंतु तरीही मनाला काही शांती मिळत नव्हती. त्यामुळे पुन्हा पुन्हा मी ती घटना कागदावर उतरवत राहतो आणि कागद फाडून टाकतो. तेव्हा मीसुद्धा चुकीचा असल्याचं कळत होतं.
#WATCH PM Narendra Modi in an interaction with Akshay Kumar, says, "I avoid using humour in today's times as I fear that my words will be twisted & misinterpreted for TRP" pic.twitter.com/JV4Gw4fslY
— ANI (@ANI) April 24, 2019
नाराजी, राग आणि लोभ हे मनुष्याच्या स्वभावाचे गुण आहेत, असंही मोदी म्हणाले आहेत. मी बऱ्याच काळापासून मुख्यमंत्री होतो. मी लहानपणी रामकृष्ण मिशन आश्रमातही गेलो होतो. 20 वर्षांच्या वयातच मी फार फिरलो. खूप भटकलो आणि जग बघितलं. फिरत फिरतच मी इथपर्यंत आलो. मी काय होईन हे मलाच ठाऊक नव्हतं, पण मी पंतप्रधान झालो.
#WATCH PM Narendra Modi during interaction with Akshay Kumar, speaks on his friends in opposition parties, especially Ghulam Nabi Azad & Mamata Banerjee pic.twitter.com/8GkqrHpqXv
— ANI (@ANI) April 24, 2019