दहशतवाद्यांचा पोलिसांवर गोळीबार; एक पोलीस शहीद तर सात जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 09:08 PM2017-09-01T21:08:34+5:302017-09-01T21:51:02+5:30

श्रीनगरमधील पंथाचौकात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर हल्ला केला. यामध्ये एक पोलीस शहीद झाला असून सात पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

Police firing terrorists and six policemen were injured | दहशतवाद्यांचा पोलिसांवर गोळीबार; एक पोलीस शहीद तर सात जण जखमी

दहशतवाद्यांचा पोलिसांवर गोळीबार; एक पोलीस शहीद तर सात जण जखमी

श्रीनगर, दि. 01 - श्रीनगरमधील पंथाचौकात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर हल्ला केला. यामध्ये एक पोलीस शहीद झाला असून सात पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंग करताना दहशतवाद्यांनी पंथाचौकात पोलिसांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारानंतर पोलिसांनी घटनास्थळी अन्य पोलिसांना आणि लष्काराच्या जवानांना पाचारण केले असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, या गोळीबारात सात पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येते. तर, एक पोलीस शहीद झाला आहे. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामुळे पंथाचौकातील परिसरत घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी हा परिसर खाली केला आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.   

गेल्या आठवड्यात  दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील पोलीस लाईनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात दोन जवान शहीद झाले, तर पाचजण जखमी झाले आहेत. तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. पुलवामाच्या या तळावर सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस मोठ्या संख्येने आहेत. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलीस दलाचा एक आणि सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला.

https://twitter.com/hashtag/Visuals?src=hash">#Visuals J&K: Terrorists attacked a bus of security personnel in Srinagar's Pantha Chowk. Five policemen injured. pic.twitter.com/gjVNHeyBqs

— ANI (@ANI) September 1, 2017


दुसरीकडे, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे समजते. पाकिस्तानच्या या गोळीबाराला सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पलटवार करून प्रत्युत्तर दिले आहे.  गेल्या आठवड्यात भारतीय जवानांच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे तीन रेंजर्स ठार झाले होते.


 

सविस्तर वृत्त लवकरच...

Web Title: Police firing terrorists and six policemen were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.