'अयोध्येत राम मंदिर बांधा आणि लखनऊत मस्जिद', शिया सेंट्र्ल वक्फ बोर्डाचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 02:48 PM2017-11-20T14:48:24+5:302017-11-20T14:54:18+5:30
अयोध्येत राम मंदिर बांधलं जावं, पण सोबतच लखनऊत मस्जिददेखील बांधली जावी, असा प्रस्ताव शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने ठेवला आहे.
लखनऊ - अध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर एकीकडे राम मंदिर आणि बाबरी मस्जिद वादात मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने एक प्रस्ताव ठेवला आहे. अयोध्येत राम मंदिर बांधलं जावं, पण सोबतच लखनऊत मस्जिददेखील बांधली जावी, असा प्रस्ताव शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने ठेवला आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चेअरमन सय्यद वसीम रिजवी यांनी सांगितलं आहे की, 'वेगवेगळ्या पक्षांसोबत चर्चा केल्यानंतर विचार करुन आम्ही एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात अयोध्येत राम मंदिर आणि लखनऊत मस्जिद बांधण्याबद्दल सांगण्यात आलं आहे. कारण हा एकमेव उपाय आहे ज्यामुळे देशात शांतता आणि बंधुभाव टिकून राहिल'. 31 ऑक्टोबरला सय्यद वसीम रिजवी यांनी बंगळुरुत श्री श्री रवीशंकर यांची भेट घेत वाद शांततापुर्ण मार्गाने सोडवण्यासंबंधी चर्चा केली होती.
After discussions with different parties we have prepared a proposal in which a Ram Temple will be built in Ayodhya and a Mosque can be built in Lucknow.This is a solution which will ensure peace and brotherhood in the country: Syed Waseem Rizvi,Chairman,Shia Central Waqf Board pic.twitter.com/Y8LjtNR8jg
— ANI (@ANI) November 20, 2017
श्री श्री रवीशंकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सय्यद वसीम रिजवी बोलले होते की, 'संपुर्ण देश आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचा आदर करतो. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेला हा वाद मित्रत्वाने मिटला पाहिजे असं शिया समाजाचं म्हणणं आहे'. यासोबत रिजवी यांनी सांगितलं होतं की, 'या मुद्दयावर शिया पंथियांना आपलं मत मांडण्याचा पुर्ण हक्क आहे. कारण 1944 पासून शिया बाबरी मस्जिदमध्ये नमाजाला जात होते. शिया प्रशासनाकडून चालवण्यात येणारी ही मस्जिद सुन्नी पंथियांनी आपल्या नावाने रजिस्टर केली होती. मात्र नंतर बेकायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं होतं'.
दुसरीकडे शिया पर्सनल लॉ बोर्ड मात्र मस्जिद जागेवरुन हटवण्यात तयार नाहीत. रविवारी बोर्डाचे संस्थापक मौलाना सय्यद अली हुसे रिजवी यांनी सांगितलं की, 'शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिजवी नाटकं करत आहेत. रिजवी संपुरण शिया पंथाला बदनाम करत आहेत. कायदेशीर अटक टाळण्यासाठी ते आरएसएसची भाषा बोलत आहेत'. 'अयोध्येत राम मंदिर उभारण्यावर मुस्लिमांचा काहीच आक्षेप नाही. पण बाबरी मस्जिदच्या जागेवर कब्जा करत मंदिर उभारलेलं कोणत्याही मुस्लिमाला मान्य नाही', असंही ते बोलले आहेत.